Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 17:31 IST2020-05-19T17:29:32+5:302020-05-19T17:31:03+5:30
Lockdown 4.0 : याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात
मुंबई - मुलुंड पूर्व येथे मुंबईकडून ऐरोलीकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीवरील पूर्व द्रुतगती महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री २२.३५ वाजताच्या सुमारास झाला. वीरेंद्र ट्रॅव्हल्स या खाजगी बस (एमएच ०४, जीपी २५१०) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील प्रवासी बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून नवघर ब्रिजच्या सुरुवातीला डाव्या बाजूला दुभाजकाला धडकून अपघात घडल्याची घटना घडली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. खाजगी बसचा चालक, मालक आणि एजंट यांना बेकायदेशीर बसमध्ये बसवून महाराष्ट्र शासनाच्या लॉकडाऊन आदेश आणि पोलीस आयुक्तांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम १८८, २६९, २७९, ३३७, ३४ आणि मोटारवाहन कायदा कलम १८४, ६६(१), १९२ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Coronavirus Lockdown : डिप्रेशनचे औषध विक्रीच्या बहाण्याने पठ्ठ्याने विकल्या नशेच्या गोळ्या
बँकेचा साधा क्लार्क कसा बनला कर्नाटकातील सर्वात मोठा डॉन, जाणून घ्या 'कारण'