LMOTY 2023: संघर्षातून राजकारणाकडे! प्रसाद लाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 09:05 PM2023-04-26T21:05:08+5:302023-04-26T21:06:52+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.

LMOTY 2023 From Struggle to Politics Lokmat Maharashtrian of the Year award to bjp leader Prasad Lad | LMOTY 2023: संघर्षातून राजकारणाकडे! प्रसाद लाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

LMOTY 2023: संघर्षातून राजकारणाकडे! प्रसाद लाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

googlenewsNext

राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. राजकारण (प्रॉमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदा म्हणजेच २०२३ च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी भाजपचे आमदार प्रसाद लाड ठरले आहेत. 

मुंबईत जन्म झालेल्या प्रसाद लाड यांचा प्रवास हमाली करण्यापासून ते आमदार होण्यापर्यंतचा संघर्षमय राहिलेला आहे. सध्या ते विधानपरिषदेचे आमदार असून ते विधानपरिषदेत भाजपचे प्रतोद आहेत. २०१६ पासून ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. पुण्यातील महालक्ष्मी तिरुपती एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष असून या माध्यमातून ते बालेवाडी येथील चार हजार विद्यार्थ्यांची काळजी घेतात. लाड अध्यक्ष असलेल्या मी मुंबई अभियान - अभिमान या उपक्रमांतर्गत शेतकरी आठवडी बाजार अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून १ कोटीहून अधिक नागरिक आणि पाच शेतकऱ्यांना लाभ होत आहे.

‘आईचा डब्बा’ या उपक्रमांतर्गत अनेक महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला असून, याद्वारे परवडणाऱ्या किमतीत घरपोच अन्नाची गरज भागवली जाते. तसेच ६००० हून अधिक गरजूंना घरपोच वैद्यकीय मदत व औषध देण्यासाठी मोबाइल मेडिकल व्हॅनही त्यांनी सुरू केली आहे. प्रसाद लाड व्यावसायिक म्हणूनही यशस्वी ठरले आहेत. क्रिस्टल ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी जवळपास ९० हजार तरुणांना रोजगार दिला असून २० वर्षांपासून ते हा उद्योग यशस्वीपणे चालवत आहेत.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. 

Web Title: LMOTY 2023 From Struggle to Politics Lokmat Maharashtrian of the Year award to bjp leader Prasad Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.