अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतले गेले, चंद्रकांत पाटलांकडून रिशेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 01:42 PM2021-03-25T13:42:29+5:302021-03-25T13:46:19+5:30

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला, या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

A letter was written from Anil Deshmukh on the 21st itself, a question from Chandrakant Patil | अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतले गेले, चंद्रकांत पाटलांकडून रिशेअर

अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतले गेले, चंद्रकांत पाटलांकडून रिशेअर

Next
ठळक मुद्देनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले. ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani Bomb Scare) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, या प्रकरणात NIA ने वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली, या प्रकरणाचा धागेदोरे शोधण्यासाठी NIA तपास करत आहेत, यातच वाझेंचे निलंबन करत ठाकरे सरकारनं मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग(Param Bir Singh) यांचीही उचलबांगडी केली, सध्या राज्यात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे प्रकरण गाजत आहे. यावरुन, विरोधकही महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला, या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याप्रकरणी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे, या पत्रात म्हटलंय की, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दुधका दुध, पानीका पानी करावं अशी मागणी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, या पत्राचा स्क्रीनशॉट शेअर करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलाय. 

अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले, ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले. १०० कोटींच्या वसुलीचे आरोप व पत्रात व्हाट्सअँप-एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाब.. तर नाही ??, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे. पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन या प्रश्नासोबतच पत्राचा फोटो शेअर केलाय.  

अनिल देशमुख यांनी लिहिलेलं पत्र

Web Title: A letter was written from Anil Deshmukh on the 21st itself, a question from Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.