Let's make Maharashtra the number one tourist state - CM | महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री

महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू, असा विश्वास मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे, तसेच खारघर येथील ‘एमटीडीसी रेसिडन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. सोबतच राज्यातील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसा स्थळे, राज्यातील विमानतळे, महत्त्वाची हॉटेल्स, रिसॉटर््स आदींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्र टुरिजम- समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

पर्यटन दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, केवळ पर्यटनस्थळांचा विकास करून चालणार नाही, तर तिथे जायचे कसे, राहायचे कुठे, जवळची रेल्वे स्थानके, विमानतळ, त्या पर्यटनस्थळास भेट देण्याचा योग्य काळ कोणता आदी इत्यंभूत माहिती, सोईसुविधा पर्यटकांना उपलब्ध कराव्या लागतील. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते, तर मंत्री छगन भुजबळ, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर आॅनलाइन सहभागी झाले होते.

थोरात म्हणाले, पर्यटनातून रोजगार निर्मितीसह राज्याला मोठा महसूलही मिळतो. पर्यटन विकासास चालना देण्यात येईल, तर आज सुरू केलेले ग्रेप पार्क रिसॉर्ट, बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनास चालना मिळेल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्याच्या ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. कोकणात हॉटेल ताज गुंतवणूक करत आहे. चिपी विमानतळही लवकरच सुरू होईल. महाराष्ट्रात येणाºया पर्यटकांना खारघर युथ हॉस्टेलचा उपयोग होईल.
तर, रायगडमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्योगासह पर्यटन विकासाचा प्रयत्न असेल, असे पर्यटन राज्यमंत्री, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.

गुंफा, गडकिल्ले, वन्यप्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे राज्याचे वैभव आहे. ते जगापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळ महाराष्ट्राचे हे मोलाचे वैभव जगासमोर पोहोचवून महाराष्टÑाला पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू या, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Let's make Maharashtra the number one tourist state - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.