जीवघेणं ठरलं 'लिअरजेट ४५'! यापूर्वी मुंबईतही कोसळलेलं अजित पवार प्रवास करत असलेल्या कंपनीचं विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 12:27 IST2026-01-28T12:07:09+5:302026-01-28T12:27:12+5:30

अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाचा २०२३ मध्येही झाला होता अपघात

Learjet 45 proved fatal plane belonging to the same company that Ajit Pawar was traveling in had also crashed in Mumbai previously | जीवघेणं ठरलं 'लिअरजेट ४५'! यापूर्वी मुंबईतही कोसळलेलं अजित पवार प्रवास करत असलेल्या कंपनीचं विमान

जीवघेणं ठरलं 'लिअरजेट ४५'! यापूर्वी मुंबईतही कोसळलेलं अजित पवार प्रवास करत असलेल्या कंपनीचं विमान

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. मात्र, या दुर्घटनेनंतर समोर आलेली एक माहिती अधिक धक्कादायक आहे. ज्या लिअरजेट ४५ विमानाचा अपघात झाला, तशाच प्रकारच्या विमानाचा सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर भीषण अपघात झाला होता. एकाच कंपनीच्या विमानांचा वारंवार होणारा अपघात आता मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.

२०२३ मधील तो अपघात आणि आजची पुनरावृत्ती

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, १४ सप्टेंबर २०२३ रोजी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे याच श्रेणीतील एक विमान विशाखापट्टणमूहून मुंबईला येत असताना धावपट्टीवर घसरले होते. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे ते विमान दोन तुकड्यांत विभागले गेले होते. सुदैवाने, त्यावेळी विमानातील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले होते. मात्र, आज बारामतीत याच कंपनीच्या विमानाला लँडिंग करताना अडचणी आल्या आणि भीषण स्फोट होऊन अजित पवारांसह ५ जणांचा अंत झाला.

अपघाताचा घटनाक्रम आणि तांत्रिक कारणे

बुधवारी सकाळी ८ वाजता मुंबईहून निघालेले हे विमान ४५ मिनिटांनंतर बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत होते. हे लिअरजेट ४५ (VT-SSK) हे छोटे खाजगी विमान होते, जे चार्टर प्रवासासाठी वापरले जाते. कंपनीचे कॅप्टन व्ही.के. सिंह यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नसावा, ज्यामुळे हे क्रॅश लँडिंग झाले.

विमानाचा जागतिक इतिहासही अशुभ

अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या मॉडेलचा इतिहास जगभरात वादग्रस्त राहिला आहे:

१. मेक्सिको (२०२१): मेक्सिकन वायुसेनेचे लिअरजेट ४५ विमान उड्डाणानंतर लगेच कोसळले होते, ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता. 

२. मेक्सिको सिटी (२००८): मेक्सिकोच्या गृहमंत्र्यांचे विमान अशाच प्रकारे कोसळले होते, ज्यात विमानातील सर्व आणि जमिनीवरील ७ जणांचा बळी गेला होता. 

३. इटली (२००३): मिलान विमानतळावर पक्ष्यांच्या धडकेमुळे या विमानाचा अपघात झाला होता.

व्हीएसआर व्हेंचर्स काय आहे?
दिल्लीस्थित ही कंपनी खाजगी जेट भाड्याने देणे, वैद्यकीय मदतीसाठी एअर ॲम्ब्युलन्स पुरवणे आणि सल्लागार म्हणून काम करते. १९९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या या सुपर-लाईट बिझनेस श्रेणीतील विमानांच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

एकाच कंपनीची दोन विमानं, दोन अपघात!

दोन वर्षांत एकाच कंपनीच्या दोन विमानांचा महाराष्ट्रात अपघात होणे ही चर्चेची बाब आहे. २०२३ च्या अपघातातून धडा घेऊन या विमानांच्या देखभालीकडे लक्ष दिले गेले होते का? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.
 

Web Title : 'लीयरजेट 45' घातक: पहले मुंबई में भी इसी कंपनी का विमान दुर्घटनाग्रस्त

Web Summary : एक 'लीयरजेट 45' विमान दुर्घटनाग्रस्त, पहले भी इसी कंपनी का विमान मुंबई में दुर्घटनाग्रस्त हुआ था। विश्व स्तर पर पहले हुई 'लीयरजेट 45' दुर्घटनाओं से सुरक्षा संबंधी चिंताएँ बढ़ गई हैं। दो सालों में दो दुर्घटनाओं के बाद वीएसआर वेंचर्स की जाँच जारी है।

Web Title : 'Learjet 45' Fatal: Same Company Plane Crashed in Mumbai Earlier

Web Summary : A Learjet 45 crash echoes a prior Mumbai incident involving the same company. Past Learjet 45 crashes globally raise safety concerns. VSR Ventures faces scrutiny after two accidents in two years. Investigation ongoing.