पालिकेच्या खर्चातून नेते, अधिकाऱ्यांचा जपान दौरा

By Admin | Updated: May 31, 2015 00:42 IST2015-05-31T00:42:40+5:302015-05-31T00:42:40+5:30

जपानच्या योकोहामा व मुंबई या दोन शहरांमध्ये असलेले भगिनी शहर कराराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महापौर स्रेहल आंबेकर जपान दौऱ्यावर आहेत़

Leaders from the expenditure of the Municipal Corporation, officers visit Japan | पालिकेच्या खर्चातून नेते, अधिकाऱ्यांचा जपान दौरा

पालिकेच्या खर्चातून नेते, अधिकाऱ्यांचा जपान दौरा

मुंबई : जपानच्या योकोहामा व मुंबई या दोन शहरांमध्ये असलेले भगिनी शहर कराराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महापौर स्रेहल आंबेकर जपान दौऱ्यावर आहेत़ परंतु त्यांच्याबरोबर जाणाऱ्या उपमहापौर, सभागृह नेत्या व अतिरिक्त आयुक्तांच्या दौऱ्याचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून भागविण्यात येणार आहे़ मात्र अशा दौऱ्यातून कोणताही नवीन प्रकल्प मुंबईत येत नसल्याने हा खर्च उधळपट्टीच ठरणार आहे़
भगिनी शहराचे ५० वर्षे पूर्ण होत असल्याने योकोहामा शहरात १ ते ३ जूनदरम्यान भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ या शहराच्या महापौरांनी मुंबईच्या महापौरांना
या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते़ त्यांच्याबरोबर उपमहापौर अलका केरकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि अतिरिक्त आयुक्त डॉ़ पल्लवी
दराडेही आज रात्री जपानला रवाना झाल्या़
महापौरांचा प्रवास खर्च, तेथील वास्तव्य व इतर खर्च या शहरामार्फत करण्यात येणार आहे़ परंतु त्यांच्याबरोबर जाणाऱ्या अन्य नेते व अधिकाऱ्यांचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून करण्यात येणार आहे़ यास सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत
मंजुरी देण्यात आली आहे़ या
दौऱ्यावर पालिकेच्या तिजोरीतून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च होणार आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Leaders from the expenditure of the Municipal Corporation, officers visit Japan