मदत करताना हाती आला मुलाचा मृतदेह; समोरच कापड दुकान, बापाचे काळीज हेलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 06:34 IST2024-12-11T06:34:32+5:302024-12-11T06:34:46+5:30

Kurla Bus Accident: कॉमर्स शाखेत प्रथम वर्षात शिकणारा मुलगा शिवम दुकानावर आला होता. त्यावेळी काही काळ दुकानात बसल्यानंतर नाश्ता करण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेला.

Kurla Bus Accident Stroy: While helping, the body of the son was found; In front of the cloth shop, father's anger was shaken | मदत करताना हाती आला मुलाचा मृतदेह; समोरच कापड दुकान, बापाचे काळीज हेलावले

मदत करताना हाती आला मुलाचा मृतदेह; समोरच कापड दुकान, बापाचे काळीज हेलावले

संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : बस दुर्घटना झाल्याच्या समोर कपड्याचे दुकान असल्याने बाबूराव कश्यप घटनास्थळी गेले. त्यावेळी जखमींना मदत करत असताना त्यांना त्यांचा मोठा मुलगा गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी मुलाला उचलले आणि भाभा रुग्णालयात धाव घेतली पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

धारावी येथे राहणारे बाबूराव कश्यप यांचे कपड्याचे दुकान एलबीएस मार्गावर आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांचा खालसा महाविद्यालयात कॉमर्स शाखेत प्रथम वर्षात शिकणारा मुलगा शिवम दुकानावर आला होता. त्यावेळी काही काळ दुकानात बसल्यानंतर नाश्ता करण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेला. त्यावेळी बाबूराव कश्यप यांना मोठा अपघात झाल्याचा आवाज झाला. त्या दिशेने ते पळाले. जखमींना ते मदत करत होते. मात्र त्याचे हे काम चालू असताना त्यांना त्याचा मुलगा गंभीर अवस्थेत आढळून आला. त्यांनी त्याला तत्काळ उचलून भाभा रुग्णालयात घेऊन गेले. मात्र त्या ठिकणी त्या मृत घोषित केले. 

Web Title: Kurla Bus Accident Stroy: While helping, the body of the son was found; In front of the cloth shop, father's anger was shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.