कुणाल कामरा पुन्हा चर्चेत, 'लाच' देण्यासाठी पोहोचला राज ठाकरेंच्या घरी... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:26 AM2020-02-04T11:26:59+5:302020-02-04T11:34:45+5:30

सोशल मीडियात कॉमेडियन कुणाल कामरा याचीच चर्चा सुरू आहे. 

kunal kamra gives bribe to mns chief raj thackeray | कुणाल कामरा पुन्हा चर्चेत, 'लाच' देण्यासाठी पोहोचला राज ठाकरेंच्या घरी... 

कुणाल कामरा पुन्हा चर्चेत, 'लाच' देण्यासाठी पोहोचला राज ठाकरेंच्या घरी... 

Next

मुंबई : पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात त्रस्त केल्याबद्दल कुणाल कामरा याला चार विमान कंपन्यांनी सहा महिने प्रवास बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात कॉमेडियन कुणाल कामरा याचीच चर्चा सुरू आहे. 

यातच आता कुणाल कामराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'लाच' देऊ केली आहे. विशेष म्हणजे, कुणाल कामरा थेट राज ठाकरेंच्या घरी गेला आणि लाच म्हणून त्यांच्या आवडीचे मुंबईतील किर्ती कॉलेजजवळील ‘किर्तीचे वडे’ घेऊन गेला. यासंदर्भात कुणाल कामराने स्वतः ट्विट करून सांगितले आहे. 

कुणाल कामराने राज ठाकरे यांना एक पत्र सुद्धा लिहिले आहे. ते ट्विट केले असून यामध्ये राज ठाकरे यांनी वेळ द्यावा, अशी विनंती केली आहे. या पत्रात "मी रिसर्च केले आणि यात तुम्ही मुंबईतील किर्ती वड्याचे मोठे चाहते असल्याचे समजले म्हणून मी तुम्हाला तुमचा आवडता खाद्यपदार्थ 'लाच' म्हणून देतो आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल." असे कुणाल कामराने म्हटले आहे. 

याचबरोबर, कुणाल कामराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. "राज ठाकरे सर आता तरी मला वेळ द्या. सर्व लोकांना वाटते की, मला माझ्या शोमध्ये पाहुण्यांना आणण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. हे बघा पाहुण्यांना आणण्यासाठी मी किती प्रयत्न करत असतो. तुमच्यापर्यंत अधिक चांगली माहिती पोहोचविण्यासाठी मी यापेक्षाही अधिक प्रयत्न करणार आहे."

दरम्यान, कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी 25 जानेवारी रोजी मुंबईहून लखनौला जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते. त्यावेळी कुणाल कामराने यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासोबत गैरवर्तन करत त्याच्या व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप करत कुणाल कामरावर इंडिगोसह इतर विमान कंपन्यांनी सहा महिने प्रवास बंदी घातली होती. 

Arnab Goswami faces Kunal Kamra again in flight | विमानात पुन्हा अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा समोरासमोर आले अन्...

कुणाल कामराची इंडिगोला कायदेशीर नोटीस; केली 25 लाखाची मागणी
पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप करत कामरावर इंडिगोसह इतर विमान कंपन्यांनी सहा महिने प्रवास बंदी घातली आहे. त्यामुळे आता नुकसानभरपाई द्या म्हणत कुणाल कामराने इंडिगोला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, इंडिगो कंपनीने आपल्यावर घातलेली बंदी तात्काळ मागे घ्यावी. तसेच ‘कंपनीने सर्व वर्तमानपत्रे, इलेक्ट्रीक माध्यामे आणि कंपनीच्या सर्व सोशल नेटवर्किंग साईट्स अकाऊंटवरुन आपली बिनशर्थ माफी मागावी,’ अशी मागणीही कुणालने केली आहे.

Four companies banned from airing comedy actor Kunal Kamra | विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या हवाई प्रवासावर चार कंपन्यांची बंदी

याचबरोबर, इंडिगो कंपनीने केलेल्या कारवाईमुळे मला मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे माझ्यावर तडकाफडकी बंदी घालण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कुणाल यांनी केली आहे. याशिवाय, बंदी घातल्याने झालेल्या मानसिक त्रासाच्या मोबदल्यात 25 लाखांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कुणाल कामराने केली आहे. यासंदर्भात त्यांने एक ट्विटही केले होते. 

महत्त्वाच्या बातम्या 

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...

जवानांना आवश्‍यकतेनुसार जेवण, कपडे मिळत नाहीत; कॅगचा ठपका!

प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना

Corona Virus: कोरोना व्हायरसप्रकरणी राज्यात सहा जण निरीक्षणाखाली; ८३ रुग्णांची दूरध्वनीद्वारे विचारपूस

China Coronavirus : चीनमधील मृतांची संख्या ३६१; आतापर्यंत १७,२०५ लोकांना संसर्ग

Web Title: kunal kamra gives bribe to mns chief raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.