केडीएमटीत ठोक वेतनाने होणार भरती

By Admin | Updated: June 23, 2015 00:54 IST2015-06-23T00:54:02+5:302015-06-23T00:54:02+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेकेदार पद्धतीने होणारी चालक-वाहकांची भरती प्रक्रिया मोडून काढा, परिवहनच्या खात्यातून

KDMT will be recruited for haul salary | केडीएमटीत ठोक वेतनाने होणार भरती

केडीएमटीत ठोक वेतनाने होणार भरती

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेकेदार पद्धतीने होणारी चालक-वाहकांची भरती प्रक्रिया मोडून काढा, परिवहनच्या खात्यातून दिला जाणारा निधी थेट कामगारांच्या खिशात जाऊ द्या, आणि स्थानिकांना रोजगाराची संधी मिळू द्या असा पवित्रा घेऊन स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी शनिवारची महासभा गाजवली. त्यांच्या आक्रमक पावित्र्याला सर्व सदस्यांनी पाठींबा देऊन नव्याने आलेल्या - येणाऱ्या बससाठी चालक-वाहकांची भरती ठोक वेतन पद्धतीने करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
म्हात्रेंनी मांडलेल्या मुद्यामुळे हा निर्णय होऊ शकल्याची प्रतिक्रिया परिवहनचे सभापती नितीन पाटील यांनी दिली. त्यापाठोपाठ परिवहनच्या चिकनघर येथील एका आरक्षित भूखंडावर एका बांधकाम व्यावसायिकाने कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्याने त्या ठिकाणी असलेले परिवहनचे बोर्ड काढून टाकल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार त्याला बिनदिक्कतपणे व्यवसाय करण्यास कोणाचा आशिर्वाद आहे असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसह विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांना विचारला. त्यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण तंग झाले होते. संबंधितावर तात्काळ कारवाई करा, अशी मागणीही करण्यात आली. त्यावर आयुक्तांनीही तातडीने ती करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: KDMT will be recruited for haul salary