kangana ranaut allegations on anurag kashyap and taapsee pannu over income tax raids | 'ती' हिंसक घटना अन् शाहीनबाग आंदोलनासाठी तापसी, अनुरागनं पैसा पुरवला; कंगनाचा थेट आरोप

'ती' हिंसक घटना अन् शाहीनबाग आंदोलनासाठी तापसी, अनुरागनं पैसा पुरवला; कंगनाचा थेट आरोप

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ( Taapsee Pannu) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्या घर व कार्यालयांवर आयकर विभागानं (Income Tax Raid) टाकलेल्या धाडीत अनेक पुरावे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. यात जवळपास ३५० कोटी रुपयांची करचोरीचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत. या प्रकरणावरुन आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangna Ranaut) तापसी आणि अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केले आहेत. (Kangna Ranaut Allegations on Taapsee Pannu And Anurag Kashyap Over IT Raids)

आयकर विभागनं केलेल्या कारवाईबाबत माहिती देणारं पत्रक कंगनानं ट्विट केलं आहे. त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये कंगनानं तापसी आणि अनुराग कश्यप यांचा चोर म्हणून उल्लेख केलाय. "ते फक्त टॅक्स चोर नसून काळा पैशाचाही व्यवहार यात झाला आहे. त्यांना हा पैसा शाहिन बाग आंदोलन आणि प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराला चिथावणी देण्यासाठी मिळाला होता का? त्यांच्याकडे हा काळा पैसा आला कुठून? आणि तो त्यांनी पाठवला कुठं? कुणाच्या खात्यात जमा केला?", असे सवाल कंगनानं उपस्थित केले आहेत. 

कंगनानं यासोबतच एक चारोळी लिहून पंतप्रधान मोदींचं कौतुक आणि टॅक्स चोरी करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "जो चोर होते हैं वो सिर्फ़ चोर होते हैं, जो मातृभूमि को बेचकर उसके टुकड़े करना चाहते हैं वो सिर्फ़ ग़द्दार होते हैं, और जो ग़द्दारों का साथ देते हैं वो भी चोर होते हैं... क्यूँकि चोर चोर मौसेरे भाई होते हैं.. और जिससे चोरों को डर लगता है ...वो साधारण मानव नहीं नरेंद्र मोदी होता है", असं ट्विट कंगनानं केलं आहे.

दरम्यान, आयकर विभागानं टाकलेल्या धाडीत मोठे पुरावे हाती लागल्यामुळे अनुराग आणि तापसीच्या अडचणीत आता वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  मिळकत (income) आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत. आयकर विभागाला या प्रकरणात एकूण मिळून ३५० कोटी रुपयांच्या कर चोरीची शंका आहे. 

बापरे! ३५० कोटींची अफरातफर; तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप प्रकरणात मोठे पुरावे हाती!

अभिनेत्री तापसी पन्नू हिच्याकडून ५ कोटी रुपयांचे नगद व्यवहाराच्या पावत्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. याशिवाय, अनुराग कश्यपच्या चौकशीत आयकर विभागाला २० कोटी रुपयांपर्यंतचे कर चोरीचे पुरावे हाती मिळाले आहेत. याच पद्धतीचे काही पुरावे तापसीकडेही सापडले आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut allegations on anurag kashyap and taapsee pannu over income tax raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.