“CM उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”: जावेद अख्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:04 PM2021-09-15T13:04:39+5:302021-09-15T13:04:57+5:30

जावेद अख्तर यांनी सविस्तर लेख लिहून अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

javed akhtar appreciated cm uddhav thackeray popularity surpass of mamata banerjee and stalin | “CM उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”: जावेद अख्तर

“CM उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”: जावेद अख्तर

googlenewsNext

मुंबई: गीतकार, कवी जावेद अख्तर यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर जावेद अख्तर यांना अनेक स्तरांवर जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या एकूण प्रकरणानंतर जावेद अख्तर यांनी सविस्तर लेख लिहून अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची असल्याचे म्हटले आहे. (javed akhtar appreciated cm uddhav Thackeray popularity surpass that of Mamata Banerjee and Stalin)

“मग तुम्ही मोदी सरकारलाही देशविरोधी म्हणणार का?”; रघुराम राजन यांची विचारणा

जावेद अख्तर यांनी सामनामध्ये लेख लिहून या प्रकरणी स्पष्टीकरण देत सविस्तर भाष्य केले आहे. जेव्हा ‘एनडीटीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे इतके तीव्र पडसाद उमटतील. एका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला समर्थनाचे संदेश पाठवले आहेत आणि माझ्या मताशी त्यांची सहमती व्यक्त केली आहे. मी त्या सर्वांचे नक्कीच आभार मानीन, पण प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे, असे जावेद अख्तर यांनी स्पष्ट केले आहे. 

“हिंदू जगातील सर्वांत सहिष्णू, सभ्य; हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही”

अन्याय करत असल्याचा आरोप करु शकत नाहीत

एकीकडे हिंदू उजव्या विचारसरणीचे समर्थक माझ्यावर चिडलेले असताना एका प्रमुख राजकीय नेत्याने आपल्या महाविकास आघाडी सरकारला तालिबाने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत उत्कृष्ट नेतृत्वाखाली ज्या ती पक्षांच्या आघाडीचे महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन आहे, त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. महाराष्ट्रातील त्यांची लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे. त्यांचे सर्वात कठोर टीकाकारही त्यांच्यावर कोणताही भेदभाव किंवा अन्याय करत असल्याचा आरोप करु शकत नाहीत. असे असताना कोणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबाने कसे व का म्हणू शकले हे मला तरी उमगलेले नाही, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे. 

Vi साठी ‘या’ बँकांचे मोदी सरकारला साकडे; पुढाकार घेत केली महत्त्वाची मागणी

आरोपात कणभरही सत्य नाही

काहींनी माझ्यावर तालिबानचे गौरवीकरण केल्याचा आरोप केला आहे. यापेक्षा तथ्यहीन आणि हास्यास्पद काहीही असू शकत नाही आणि माझ्या मनात अशा मानसिकतेच्या लोकांबद्दल फक्त तिरस्कार आहे, असे सांगत हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत, याचा मी अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे आणि हेदेखील ठामपणे बोललो आहे की, हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की, इतक्या ठामपणे आणि स्पष्ट बोलूनही काही लोक माझ्यावर इतके नाराज का आहेत? याचे उत्तर असे आहे की, मी सर्वच धर्मांमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांचा, धर्मांधांचा, कडव्यांचा स्पष्टपणे निषेध केला आहे. प्रत्येक समुदायाच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये विलक्षण साम्य आहे, यावर मी जोर दिला आहे, असे जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत बरेच साम्य, गोळवलकरांचा उल्लेख केल्याने नाराजी, धर्म, जात आणि पंथाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही विचारसरणीला विरोध अशा अनेकविध मुद्द्यांवर जावेद अख्तर यांनी परखडपणे भाष्य केले आहे. 
 

Web Title: javed akhtar appreciated cm uddhav thackeray popularity surpass of mamata banerjee and stalin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.