जय महाभारत पार्टी निवडणुकीच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 21:38 IST2024-03-13T21:36:42+5:302024-03-13T21:38:02+5:30
श्रीकांत जाधव/ मुंबई : देशभरात संपूर्ण दारूवर बंदी, मोफत शिक्षणाची अंमलबजावणी, सर्व धर्मियांसाठी शिष्यवृत्तीची तरतूद, महिलांना ०. २५ टक्के व्याजाने ...

जय महाभारत पार्टी निवडणुकीच्या रिंगणात
श्रीकांत जाधव/ मुंबई : देशभरात संपूर्ण दारूवर बंदी, मोफत शिक्षणाची अंमलबजावणी, सर्व धर्मियांसाठी शिष्यवृत्तीची तरतूद, महिलांना ०. २५ टक्के व्याजाने क्रेडिट सेवा असे अनेक विषयांचा अजेंडामध्ये समावेश करून जय महा भारत पार्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याची घोषणा बुधवारी येथे करण्यात आली.
जय महाभारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान श्रीअनंत विष्णू प्रभू यांनी बुधवारी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे, अजेंडा आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबाबत माहिती दिली.
आमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. शिवाय पक्षात सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, महिला वर्गास विशेष योजना असल्याने मतदारांना इतर पक्षांपेक्षा अधिक जवळचा असल्याने आमचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.