आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची माहिती वेबसाइटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 06:05 AM2018-12-04T06:05:00+5:302018-12-04T06:05:06+5:30

अखिल भारतीय पोलीस सेवेतील अधिकाºयांची (आयपीएस) आपल्या स्थावर मालमत्तेची माहिती आता संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

Information on the property of the IPS officer on the website | आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची माहिती वेबसाइटवर

आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची माहिती वेबसाइटवर

googlenewsNext

मुंबई : अखिल भारतीय पोलीस सेवेतील अधिकाºयांची (आयपीएस) आपल्या स्थावर मालमत्तेची माहिती आता संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. दरवर्षी त्यांना मालमत्तेचे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सरत्या वर्षातील मालमत्तेची माहिती येत्या ३१ जानेवारीपर्यंत केंद्रीय गृह विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अपलोड करायची आहे. राज्यातील सर्व पोलीस महासंचालक व केंद्रीय सुरक्षा एजन्सीच्या प्रमुखांना त्याबाबत नुकतेच कळविण्यात आले आहे. पोेलीस अधिकाºयांच्या मिळकतीबद्दल अनेकदा आक्षेप नोंदविला जातो. अधिकृत मिळकतीपेक्षा त्यांच्याकडे कित्येक पट अधिक संपत्ती असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व आयपीएस अधिकाºयांच्या अचल मालमत्ता गृह खात्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक आयपीएस अधिकाºयाने ३१ डिसेंबर २०१८ अखेरपर्यंतची स्थावर मालमत्तेबाबतची माहिती नव्या वर्षात ३१ जानेवारीपर्यंत खात्याच्या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे. त्याबाबत पोलीस महासंचालकांनी संबंधित अधिकाºयांना सूचना करायच्या असून मालमत्तेची माहिती विहित नमुन्यात भरून द्यायची आहे.

Web Title: Information on the property of the IPS officer on the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.