मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा महायुतीच्या सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत पहिल्यांदाच युतीत निवडणूक लढवली. या निवडणुकीत लालबाग परळ शिवडी या भागात उद्धवसेना आणि मनसेचा दणदणीत विजय झाला आहे. ऐन निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरेंच्या या गडाला भगदाड पाडण्याचं काम केले. याठिकाणचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनीही मतदानापूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. त्याशिवाय तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन अनिल कोकिळ यांनीही ठाकरेंची साथ सोडली होती. शिंदेसेनेकडून ते निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे लालबाग-परळ गड ठाकरे राखणार की शिंदे त्याला छेद देणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र निकालात जनतेने ठाकरे बंधूंना साथ दिली आणि शिवडीत उद्धवसेना-मनसेचे उमेदवार निवडून दिले.
BMC Election Results 2026 LIVE: सदा सरवरणकरांना डबल धक्का; मुलापाठोपाठ मुलगीही पराभूत
याठिकाणी वार्ड क्रमांक २०४ मधून उद्धवसेनेने किरण तावडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तिकीट मिळाली नाही म्हणून अनिल कोकिळ यांनी थेट शिंदेसेनेत प्रवेश केला आणि तावडेंना आव्हान दिले होते. किरण तावडे हे मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच उद्धवसेनेचे शाखाप्रमुख होते. या निवडणुकीत किरण तावडे यांनी विजय मिळवला आहे. या निकालानंतर उद्धवसेनेचे नेते सुधीर साळवी यांनी म्हटलं की, लालबाग परळमध्ये कधीही बंडखोरी खपवून घेतली जात नाही. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. लालबाग परळची ही तरुण पिढी आहे. वार्ड क्रमांक २०४ हा शिवसेनेच्या स्थापनेपासून कधी हरलो नाही आणि यापुढेही हरणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
BMC Election Results 2026 LIVE: सदा सरवरणकरांना डबल धक्का; मुलापाठोपाठ मुलगीही पराभूत
त्याशिवाय प्रभाग क्रमांक २०२ मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव, २०३ मधून श्रद्धा पेडणेकर यादेखील विजयी झाल्या आहेत. वार्ड क्रमांक २०५ मधून मनसेच्या सुप्रिया दळवी यांचाही विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक २०६ मधून उद्धवसेनेचे सचिन पडवळ विजयी झालेत. त्यामुळे लालबाग परळमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव करण्यासाठी शिंदेसेनेने आखलेली व्यूहरचना उधळून लावण्याचं काम ठाकरेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केले आहे. लालबाग परळमध्ये ऐन निवडणुकीत मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला होता. माजी आमदार दगडू सपकाळ आणि माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र निवडणुकीच्या निकालात शिंदेसेनेला धक्का देण्याचं काम लालबाग परळच्या जनतेने केले आहे.
Web Summary : In Mumbai's municipal elections, Uddhav Sena and MNS secured a significant victory in Lalbagh-Parel, defying predictions after defections to Shinde Sena. Loyalists upheld Thackeray's stronghold, proving unwavering support in key wards despite pre-election challenges and defections.
Web Summary : मुंबई नगर निगम चुनावों में, उद्धव सेना और मनसे ने लालबाग-परेल में महत्वपूर्ण जीत हासिल की, शिंदे सेना में दलबदल के बाद की भविष्यवाणियों को खारिज कर दिया। निष्ठावानों ने ठाकरे के गढ़ को बरकरार रखा, चुनाव पूर्व चुनौतियों के बावजूद प्रमुख वार्डों में अटूट समर्थन साबित हुआ।