Join us  

...तर थोरातांची कमळा हा उल्लेख खरा ठरला असता, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:05 PM

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर असे शीर्षक दिलेला अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर पत्राच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला गौप्यस्फोट...

ठळक मुद्देकमळ हातात घेण्यासाठी कुणी केव्हा, कुठे, कशी चाचपणी केली होती, हा वेगळा इतिहास आहेती चाचपणी यशस्वी झाली असती. तर हा उल्लेख कदाचित खरा ठरला असताबाळासाहेबांच्या काळात अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख लिहिले जात. आजच्यासारखी लाचारी तेव्हा नव्हती

मुंबई - भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज संजय राऊत यांना पत्र लिहून सामनामधून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सामनातील अग्रलेखाला प्रत्युत्तर देतानाच विखेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच अग्रलेखाचे शीर्षक असलेल्या थोरातांची कमळा या उल्लेखावरूनही मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर असे शीर्षक दिलेला अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर पत्राच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, ’’थोरांतांची कमळा असा काही उल्लेखही अग्रलेखात आहे. पण कमळ हातात घेण्यासाठी कुणी केव्हा, कुठे, कशी चाचपणी केली होती, हा वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती. तर हा उल्लेख कदाचित खरा ठरला असता,’’ विखे-पाटील यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

‘’बाळासाहेबांच्या काळात अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख लिहिले जात. आजच्यासारखी लाचारी तेव्हा नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? आम्ही पक्ष बदलले, पण ज्या पक्षात राहिलो, तिथे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल. मात्र मात्र तुमची छाती फाडून पाहिली तर त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोन नेते दिसतील, असा टोलाही विखे यांनी या पत्रातून राऊत यांना लगावला आहे.

तसेच, मला माझ्या मुलाला, माझ्या घराण्याला  राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे. त्यामुळे आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी मातोश्री तर कधी सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय, असा दुटप्पीपणा कोण करतेय हे लपून राहिलेले नाही, असा चिमटाही विखेंनी यावेळी राऊत यांना काढला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

"आमची बांधिलकी जनतेशी, ती मातोश्री ते सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही"

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :राधाकृष्ण विखे पाटीलबाळासाहेब थोरातभाजपाकाँग्रेससंजय राऊत