तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 16:48 IST2021-03-13T16:46:35+5:302021-03-13T16:48:39+5:30

Corona Virus Vaccine : तुकाराम मुंढे यांच्यापूर्वी रतन टाटा यांनीदेखील घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

IAS officer tukaram mundhe gets corona virus vaccine j j hospital mumbai posts photo on facebook previous ratan tata gor vaccine | तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले... 

तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले... 

ठळक मुद्देजे. जे रुग्णालयात जाऊन मुंढे यांनी घेतली लसतुकाराम मुंढे यांच्यापूर्वी रतन टाटा यांनीदेखील घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला परवानगी दिल्यानंतर १ मार्च २०२१ पासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वप्रथम कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यानंतर अनेक नेते, मंत्री, दिग्गजांनी लस घेतल्याचे समोर येत आहे. दरम्यान, आपल्या शिस्तबद्धतेसाठी ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी शनिवारी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून फोटोही शेअर केला आहे.

"आज मी जे.जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. सर्वजण लवकरच ही लस घेतील अशी अशा करतो. या कठिण काळात सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली असून त्यांचा अभिमान आहे," असा संदेशही तुकाराम मुंढे यांनी आपल्या फोटोसह लिहिला आहे. "कोरोना प्रतिबंधात्मक लसीत्या विकासाठी हातभार लावून आणि लसीकरणासाठी इतर देशांना सहाय्य करून भारतानं मोलाची कामगिरी बजावली आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे. 



यापूर्वी रतन टाटा यांनीदेखील घेतली लस

जागतिक पातळीवर प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेले उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. याबाबतची माहिती स्वतः रतन टाटा यांनी दिली. ८३ वर्षीय रतन टाटा यांनी कोरोना लस घेतल्यानंतर ज्येष्ठ व्यक्तींमधील कोरोना लसीसंदर्भातील भीती दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी कोरोना लसीबाबत संभ्रमावस्था असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गज आणि ज्येष्ठ व्यक्तींने कोरोना लस घेतल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत विश्वास वाढेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: IAS officer tukaram mundhe gets corona virus vaccine j j hospital mumbai posts photo on facebook previous ratan tata gor vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.