Anjali Damania ( Marathi News ) : अजित पवार यांनी काल मी त्यांना कागदपत्र दिली आहेत हे मान्य केले आहे. त्या कागदपत्रांची पडताळणी करु असं त्यांनी म्हटले आहे. आताच्या घटकेला मी चार दिवस म्हणजे ९६ तास वाट पाहणार आहे. तितक्या वेळेत जर त्यांचे आले नाही तर मी कोर्टात जाऊन या सर्वांना जबाबदार धरणार, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. दमानिया यांनी आज 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली.
रणजितसिंह मोहिते पाटलांच्या अडचणी वाढणार, पक्षविरोधी काम, भाजपा कारवाई करणार
अंजली दमानिया म्हणाल्या, आता यांना पुरावे म्हणजे नक्की काय हवे आहे. या सर्वांच्या कंपन्या एकत्र आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक लाभ मिळतो. हे लोक राख विकत आहेत, राख माफियात ते आहेत. पेपर देऊन मी त्यांना आर्थिक लाभ दाखवूनही यांना पटलेलं नाही. हे पेपर ऑनलाईन आले आहेत, ते मी घरी बनवलेले नाहीत. त्यांनी चार दिवसात यावर कारवाई केली नाही तर मला लोकायुक्त आणी सीजे दोघांकडेही मला याचिका दाखल करावी लागेल, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.
"ठोस पुरावा म्हणजे नेमकं यांना काय हवं आहे? बीड जिल्ह्यात वाल्मीक कराड याची दहशत आहे. हे दिसत आहे. आता आणखी काय हवं आहे. हे दोघंही एकमेकांचे मित्र आहे, याबाबत आम्ही पुरावे दिले आहेत. कधी कारवाई करणार आहात? हे दोघांचे मित्र आहेत म्हणून जनता गेली खड्ड्यात असं काही आहे का? तसं असेल तर सांगा जनता बघून घेईल, असंही दमानिया म्हणाल्या.
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी सापडला पण...
"सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोप सापडतो पण सर्वसामान्य असलेला संतोष देशमुख यांच्यावर हल्ला करणारा आरोपी अजूनही सापडत नाही. हे काय सुरू आहे, असा सवालही अंजली दमानिया यांनी केला. डॉ. संजय थोरात यांच्याबाबत बोलताना दमानिया म्हणाल्या, सीव्हील सर्जन बीडचे आहेत. त्यांची भ्रष्टाचार केला म्हणून ट्रान्फर होते. अशा व्यक्तीला आधी मुंबई, नाशिक, आता पुन्हा बीडला आणले जाते. हे का होत आहे? नाशिकमध्ये त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र खोटी दिली होती याबद्दल मला फोन येत आहेत. त्यांचं स्वत:च रुग्णालय आहे, मोठं हॉटेल आहे तरीही ते रुग्णालयात नोकरी का करतात. कारण इकडे जास्त पैसे मिळत असतील, असा आरोपही अंजली दमानिया यांनी केला.