मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणार-खासदार गजानन कीर्तिकर यांची स्पष्टोक्ती

By मनोहर कुंभेजकर | Published: March 12, 2024 01:28 PM2024-03-12T13:28:37+5:302024-03-12T13:29:57+5:30

आजही मतदार संघात मी सतत कार्यरत आहे. भाजप कितीही काही म्हणू देत पण मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणारच अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली.

I will contest from the North West Lok Sabha Constituency says MP Gajanan Kirtikar | मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणार-खासदार गजानन कीर्तिकर यांची स्पष्टोक्ती

मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणार-खासदार गजानन कीर्तिकर यांची स्पष्टोक्ती

मुंबई-उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात मी सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे.मी 10 वर्षात मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला असून माझ्या खासदार निधीतून अगणित विकासकामे केली आहे. माझी स्वतःची व्होट बँक आहे.आजही मतदार संघात मी सतत कार्यरत आहे. भाजप कितीही काही म्हणू देत पण मी
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणारच अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली.

तर गेल्या शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात शिवसेना शाखांच्या भेटी दरम्यान शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांची
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार म्हणून उमेदवारी जाहिर केली होती.त्यामुळे खासदार गजानन कीर्तिकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी पिता पूत्र लढत होणार का? तसेच भाजप ही जागा आपल्याकडे घेवून येथून तगडा उमेदवार किंवा लोकप्रिय सेलिब्रेटी देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीत सोमवारी रात्री महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाची सखोल चर्चा झाली. या सर्व मतदारसंघात महायुतीचे कोण उमेदवार निवडून येऊ शकतात यावर सविस्तर चर्चा झाली.आता तीनही पक्षांचे जागावाटप येत्या दोन तीन दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांची विधान परिषदेवर राजकीय पुर्नवसन करण्यात येणार आहे अशी चर्चा आहे.त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत,भाजपाला सगळे पाहिजे आहे,असा हावरटपणा काही बरोबर नाही.आमचा देखिल मान सन्मान भाजपाने ठेवलाच पाहिजे आणि सन्मानाने आम्हाला लोकसभेच्या जागा दिल्या पाहिजे असे खडेबोल त्यांनी सुनावले.

भाजपने शिवसेनेला राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघ देताना त्यात एका जागेचा बदल केला आहे तर एका मतदारसंघात उमेदवाराचा बदल केला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ भाजपने घेतला आहे. तर त्या बदल्यात शिवसेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ दिला आहे असे समजते.
 

Web Title: I will contest from the North West Lok Sabha Constituency says MP Gajanan Kirtikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.