मी वर्गातील लास्ट बेंचर्स, फडणवीसांनी सांगितलं नागपूरच्या शाळेतील बालपण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 05:31 PM2022-11-14T17:31:25+5:302022-11-14T17:35:30+5:30

फडणवीसांना बालमित्रांनी अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नावर फडणवीसांनीही अगदी लहानपण देगा देवा... अशा बालमित्रांसोबत एकरुप होऊन प्रश्नांना उत्तरे दिली.

I was the last bencher in the class, Devendra Fadnavis told about his childhood in Nagpur school | मी वर्गातील लास्ट बेंचर्स, फडणवीसांनी सांगितलं नागपूरच्या शाळेतील बालपण

मी वर्गातील लास्ट बेंचर्स, फडणवीसांनी सांगितलं नागपूरच्या शाळेतील बालपण

Next

मुंबई - राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि चाणाक्ष राजकारणी मानले जातात. त्यांच्या अभ्यासून वृत्तीची, कार्यक्षमतेची आणि निर्णयप्रक्रियेची नेहमीच चर्चाही होत असते. त्यामुळेच, ते लहानपणापासूनच हुशार आहेत की राजकारणात आल्यानंतर परिस्थितीनुसार ते बदलत गेले असाही प्रश्न अनेकांना पडणं साहजिक आहे. मात्र, आपण लहानपणी शाळेतील शिक्षकांना बरा वाटायचो, असा विद्यार्थी होतो, असे फडणवीस यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर बाल दिनाच्या निमित्ताने फडणवीसांनी मुंबईतील एका शाळेत जाऊन बालमित्रांशी गप्पा मारल्या. त्यावेळी, बालपणीच्या आठवणीत ते रममाण झाले होते.

फडणवीसांना बालमित्रांनी अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नावर फडणवीसांनीही अगदी लहानपण देगा देवा... अशा बालमित्रांसोबत एकरुप होऊन प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, लहानपणी आपणास क्रिकेट हाच खेळ सर्वाधिक आवडायचा पण मी सगळेच खेळ खेळायचो, असे त्यांनी सांगितले. तर, जांभळा हा माझा आवडता रंग होता, आणि आजही मला तो रंग आवडतो, असेही फडणवीस म्हणाले. तसेच, यावेळी फडणवीसांनी आपल्या शाळेतील काही आठवणीही सांगितल्या.  

बालपण म्हटलं माझी शाळा मला आठवते. बालपणी मी नागपूरच्या सरस्वती विद्यालयात शिक्षण घेतलं. आपली शाळा आपल्याला खूप काही शिकवत असते, आपलं व्यक्तिमत्व शाळेच्या शिक्षणातूनच घडतं. आपण मोठे झाल्यावर आपल्याला शाळेचं महत्व लक्षात येतं. शाळा आपल्याला मित्र देते, शिक्षक देते, येथील वातावरण खूप काही शिकवतं. त्यातूनच, आपलं व्यक्तिमत्व घडत असतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी शाळेत असताना अतिशय शांत विद्यार्थी होतो, थोडा उंच असल्याने मला शेवटच्या बाकावरच बसावं लागायचं, त्यामुळे मी लास्ट बेंचर्स होतो. शिक्षकांना बरा वाटेल असा विद्यार्थी मी होतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीसांनी बालपणीच्या आठवणी सांगताना शाळेमधील इतिहासाला उजळणी दिली

तुम्हाला राग आल्यावर काय करता?

मला रागच येत नाही, मला फार कमी राग येतो. पण, मला राग आला याचा अर्थ समजून घ्यायचा की मला खूप भूक लागलीय. मग, मला भूक लागली की मला राग येतो. कोणी पटकन खायला दिलं की, माझा राग संपतो. त्यामुळे, माझ्या रागावरचा उपाय हा मला खायला देणं आहे, असे उत्तर फडणवीस यांनी सांगितलं. 

माझा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड हा अल्हाद अजय असून तो मुंबईत आर्कीटेक्ट आहे. तो लहानपणी माझ्यासोबत माझ्या बँचवर बसायचा. पहिलीपासून दहावीपर्यंत आम्ही दोघेच शेवटच्या बँचवर बसायचो. आम्ही दोघांनीही शेवटच्या बँचवर कोणाला बसू दिलं नाही. 

बैलमित्र निस्वार्थी असतात

कुठलीही भेसळ नसेलेलं प्रेम हे बालपणीच्या मित्रांमध्ये पाहायला मिळतं. मी आजही माझ्या बालपणीच्या मित्रांना भेटतो, कारण बालपणीची मैत्री ही निस्वार्थी असते. त्या मित्रांपैकी कोणी मोठं होतं, कोणाला मोठं होत येत नाही. कोणी सेटल होतं, कोणाला सेटल होता येत नाही. पण, बालमित्र हे स्वार्थी नसतात. म्हणून आपल्याला अगदी चांगला वेळ कोणासोबत घालवता येत असेल तो बालमित्रांसोबतच, असे फडणवीस यांनी म्हटले. 

Web Title: I was the last bencher in the class, Devendra Fadnavis told about his childhood in Nagpur school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.