APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 05:50 IST2025-09-25T05:49:35+5:302025-09-25T05:50:09+5:30

ठरलेल्या मुदतीत निवडणूक घेण्यास एपीएमसी अपयशी ठरली, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला.

Hold APMC elections, cancel administrator appointment; High Court reprimands state government | APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

मुंबई -  मुंबई कृषी उत्पन्न  बाजार समिती (एपीएमसी)वर प्रशासक नेमण्याची राज्य सरकारची कृती केवळ बेकायदा नाही, तर दुदैवी आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारचा मुंबई एपीएमसीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय रद्द केला. तसेच एपीएमसीला तातडीने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले.

मुंबई एपीएमसीवर नियुक्त केलेल्या विद्यमान प्रशासकाने सर्व कार्यभार  पूर्वी निवडून आलेल्या  संचालक मंडळाच्या हाती सोपवावा आणि या संचालक  मंडळाने नवीन संचालक मंडळ येईपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे निर्देश न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले. मुदतवाढ मान्य न केल्याने उपसभापतींसह संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. 

याचिकेतील आक्षेप
मुंबई एपीएमसीचा कार्यकाल ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी याचिकाकर्त्यांनी संचालक मंडळाला ३१ ऑगस्टनंतर सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती राज्य सरकारला केली. ठरलेल्या मुदतीत निवडणूक घेण्यास एपीएमसी अपयशी ठरली, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला.

काय म्हणाले न्यायालय?
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याची दखल न्यायालयाने यावेळी घेतली. न्यायालयाने सरकारचा व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकला. ‘याचिकाकर्त्यांनी मुदतवाढीचा अर्ज केला असतानाही त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सरकारने थेट प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासकाची नियुक्ती करण्याची सरकारची कृती केवळ बेकायदा नाही, तर दुदैवी आहे,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. न्यायालयाने एपीएमसीला तातडीने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. सरकारने या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, त्यांची विनंती फेटाळण्यात आली आहे. 

Web Title : उच्च न्यायालय ने महाराष्ट्र सरकार को फटकारा, APMC प्रशासक नियुक्ति रद्द

Web Summary : मुंबई उच्च न्यायालय ने महाराष्ट्र सरकार की APMC प्रशासक नियुक्ति को रद्द कर दिया, इसे अवैध बताया। तत्काल चुनाव कराने के आदेश दिए गए। मौजूदा प्रशासक को पहले से निर्वाचित बोर्ड को प्रभार सौंपना होगा, जो नए बोर्ड के गठन तक नीतिगत निर्णय नहीं ले सकता।

Web Title : High Court Slams Maharashtra Govt, Cancels APMC Administrator Appointment

Web Summary : Mumbai High Court quashed Maharashtra government's APMC administrator appointment, deeming it illegal. Immediate elections were ordered. The existing administrator must hand over charge to the previously elected board, which cannot make policy decisions until the new board is formed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.