Join us

पार्थ पवारांना दणका; मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:57 IST

IT Raids on Parth Pawar Office : आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देपवार यांच्या अनेक निवडणुकीत त्या यंत्रणा राबवण्यात पुढे असतात. एका माध्यम समूहातून सरव्यवस्थापक पदावरून बाजूला झाल्यावर त्या या पब्लिशिंग कंपनीचे काम पाहतात.

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार यांचे नातलग आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात राहण्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीच्या कार्यालयावर आयकर विभागाने गुरुवारी छापा टाकला. पवार यांच्या बहिण विजया पाटील यांची पब्लिशिंग कंपनी आहे.त्या राजकारणाशी संबंधित नाहीत. त्यांची कोणतीही कंपनी नाही.पब्लिशिंग कंपनी असली तरी त्याचीही उलाढाल मर्यादित आहे. विजया पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोठ्या बहिण आहेत.

पवार यांच्या अनेक निवडणुकीत त्या यंत्रणा राबवण्यात पुढे असतात. एका माध्यम समूहातून सरव्यवस्थापक पदावरून बाजूला झाल्यावर त्या या पब्लिशिंग कंपनीचे काम पाहतात. गुरुवारी सकाळी आयकरच्या सहा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी केली. परंतु त्याबद्धल अधिकृत दुजोरा मिळाला नाही..विजया पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री पवार यांनीच घेतल्याचे तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे..त्याची चौकशी करताना आयकर विभागाने त्यांच्या कोल्हापुरातील व पुण्यातील बहिणीच्या घरी छापे टाकले. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने धाडसत्र सुरु केले आहे.तसेच काही साखर कारखान्यांवर छापा टाकण्यात आला. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :पार्थ पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसधाडइन्कम टॅक्स