इकडे शरद पवार नवी मुंबईत, तिकडे फडणवीस मुंबईतील पावसात भिजले; भाषण नाही थांबवले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 08:38 PM2023-11-26T20:38:05+5:302023-11-26T20:41:41+5:30

मुंबई, ठाण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी आज अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही नुकतीच सुरुवात झाली आहे.

Here Sharad Pawar got wet in Navi Mumbai, there Fadnavis got drenched in rain in Mumbai; No speech stopped... | इकडे शरद पवार नवी मुंबईत, तिकडे फडणवीस मुंबईतील पावसात भिजले; भाषण नाही थांबवले...

इकडे शरद पवार नवी मुंबईत, तिकडे फडणवीस मुंबईतील पावसात भिजले; भाषण नाही थांबवले...

शरद पवार यांचा पावसात भिजताना भाषण देतानाचा फोटो आजही अनेकांच्या लक्षात आहे. पक्षाचे अस्तित्व धोक्यात असताना भर पावसात दिलेले भाषण आणि निवडणुकीत मिळविलेल्या जागा यांचे गणित आजही राजकीय धुरिणांना कोड्यात टाकत आहे. तो योग आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा आला. नवी मुंबईतील एका सभेत शरद पवार बोलत असताना पाऊस आला, त्या पावसातच पवारांनी भाषण केले. परंतू, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पावसात भिजत भाषण देत होते. 

मुंबई, ठाण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी आज अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही नुकतीच सुरुवात झाली आहे. विविध राजकीय, शासकीय सभा-कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांना पावसाची झळ बसली आहे.

मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला फडणवीस संबोधित करत असताना पाऊस सुरु झाला. परंतू, फडणवीसांनी आपले भाषण सुरुच ठेवले होते. अमृता फडणवीस यांच्या पुढाकाराने ग्लोबल पीस ऑनर्सने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

शरद पवारांची आज नवी मुंबईत बचत गटांना मार्गदर्शन सभा होती. सभेची वेळ चार वाजता होती. बचत गटांच्या महिला चार वाजताच हजर झाल्या होत्या. सभेला वेळ झाल्याने बचत गटांच्या महिला भर पावसातच माघारी परतल्या. काहींनी डोक्यावर खुर्च्या घेऊन आसरा शोधला. 

Web Title: Here Sharad Pawar got wet in Navi Mumbai, there Fadnavis got drenched in rain in Mumbai; No speech stopped...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.