Happy New Year 2020 : नववर्षात कधी आहे दिवाळी, दसरा?; जाणून घ्या सार्वजनिक सुट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 09:20 AM2020-01-01T09:20:36+5:302020-01-01T09:23:12+5:30

जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

Happy New Year 2020 New Year Calendar holiday list | Happy New Year 2020 : नववर्षात कधी आहे दिवाळी, दसरा?; जाणून घ्या सार्वजनिक सुट्ट्या

Happy New Year 2020 : नववर्षात कधी आहे दिवाळी, दसरा?; जाणून घ्या सार्वजनिक सुट्ट्या

Next
ठळक मुद्देजगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. नववर्षाची सुरुवात नवीन कॅलेंडरसह झाली आहे.होळी, ईद, दसरा, दिवाळी, गणेशोत्सव हे सण कधी आहेत, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

मुंबई - जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. #हॅप्पी न्यू ईअर 2020, #न्यू ईअर, #गुडबाय 2019, #वेलकम 2020 असे हॅशटॅग वापरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2020 चे स्वागत करण्यात आले आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. 

नववर्षाची सुरुवात नवीन कॅलेंडरसह झाली आहे. त्यानुसार, नव्या वर्षात होळी, ईद, दसरा, दिवाळी, गणेशोत्सव हे सण कधी आहेत, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळला. नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात संपूर्ण मुंबईकर रंगून गेले होते. वर्षाअखेरीच्या पार्ट्या आणि कार्यक्रमाला मंगळवारच्या सायंकाळपासूनच सुरुवात झाली होती. 2020 मधील सार्वजनिक सुट्ट्यांबाबत जाणून घेऊया.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहर रोषणाईने झगमगले होते. या रोषणाईत मंगळवारी आकाशातील आतषबाजीचीही भर पडली. शहरात तुरळक ठिकाणी नव्या वर्षांच्या आगमनावेळी फटाके फोडण्यात आले, तसेच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी चौपाट्यांवर गर्दी केली होती. नरिमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडिया, येथे मुंबईकरांनी गर्दी केली. महाविद्यालयीन तरुणांची तर यामध्ये खास उपस्थिती होती, तसेच अनेकांनी सहकुटुंब उपस्थित राहून आनंदाचे क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले.

चौपाट्यांसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. संध्याकाळनंतर किनाऱ्यांवरची गर्दी वाढत गेली की, नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत बसण्यासाठी लोकांना जागा शोधावी लागत होती. अनेक पर्यटक मध्यरात्री उशिरापर्यंत किनाऱ्यांवर रेंगाळत होते. मुंबईकरांच्या संरक्षणासाठी किनाऱ्यावर, पर्यटनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात नवीन वर्षांच्या शुभेच्छा देणारे संदेश, ग्रीटिंग कार्ड इत्यादी भेटवस्तू तरुणाईने आपल्या प्रियजनांना दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. '2020 च्या हार्दिक शुभेच्छा! नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बुधवारी (1 जानेवारी) हे ट्विट केलं आहे. तसेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देत त्यांनी 2020 हे वर्ष देशवासियांच्या जीवनात आनंद घेऊन येईल, अशी प्रार्थना केली आहे. '2020 हे वर्ष भारताला बदलण्यासाठी लोकांना सशक्त करेल आणि प्रत्येक देशवासी सक्षम, सबळ होईल अशी आशा करूया' असं ट्विट करण्यात आले आहे. मोदींनी NaMo 2.0 या ट्विटर हँडलने केलेल्या एका ट्विटच्या उत्तरादाखल हे ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


 

Web Title: Happy New Year 2020 New Year Calendar holiday list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.