Greetings from Rohit Pawar to Balasaheb Thackeray's death anniversarry | मी कॉलेजसाठी मुंबईला होतो... रोहित पवारांकडून बाळासाहेबांना आठवणींचं 'अभिवादन'
मी कॉलेजसाठी मुंबईला होतो... रोहित पवारांकडून बाळासाहेबांना आठवणींचं 'अभिवादन'

मुंबई - शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरेंना राज्यातील सर्वच दिग्गजांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे. बाळासाहेबांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बाळासाहेबांना ट्विटरवरुन अभिवादन केले. तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटर आणि फेसबुकवरुन एक व्हिडीओ शेअर करत, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या आठवणी जागवल्या आहेत. तसेच, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही बाळासाहेबांचं राजकारण जवळून अनुभवता आल्याचं म्हटलंय. 

रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे बाळासाहेबांना अभिवादन केले. रोहित यांनी फेसबुक पोस्टमधून बाळासाहेबांनी मोठ्या मनाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं सांगितलं, तसेच प्रणब मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांनाही खुल्या मनाने राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता, याची आठवण करुन दिली. महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊनच बाळासाहेबांनी कार्य केल्याचं रोहित यांनी म्हटलं. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, शिवसेनेची भूमिका बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरून असल्याचंच दर्शविण्याचा प्रयत्न रोहित यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केला आहे. 

Web Title: Greetings from Rohit Pawar to Balasaheb Thackeray's death anniversarry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.