कलाकारांना शासन मदत करणार -अमित देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:10 IST2021-05-05T04:10:25+5:302021-05-05T04:10:25+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, कलाकारांना ...

The government will help the artists - Amit Deshmukh | कलाकारांना शासन मदत करणार -अमित देशमुख

कलाकारांना शासन मदत करणार -अमित देशमुख

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांस्कृतिक कार्य विभागातील अधिकाऱ्यांच्या समवेत दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत दिल्या.

कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे जवळपास वर्षभर कलाकारांना कला सादर करता आली नसून, ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याची निवेदने प्राप्त होत आहेत. तसेच काही कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आवश्यक आहे. या सगळ्याचा सहानूभतीपूर्वक विचार करून त्यांना दिलासा मिळेल अशा उपाययोजना प्रस्तावित कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. याकाळात नाट्य व चित्रपट कलावंतांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांचे अनुदानाचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. तसेच अन्य प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंतांच्या समस्या सोडविण्याकडेही प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

----------------------------------------------------------------------------------------

Web Title: The government will help the artists - Amit Deshmukh