ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 01:29 IST2020-09-10T01:29:37+5:302020-09-10T01:29:42+5:30

आपल्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार या सर्वांना दाबण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.

This is the government sponsored terror in Maharashtra; Sauys BJP Leader Devendra Fadnavis | ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस

ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या घराचे बांधकाम ज्या पद्धतीने पाडण्यात आले त्यावरून राज्यात सरकार पुरस्कृत दहशत सुरू असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतके घाबरट आणि लोकशाहीविरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेले नाही. आपल्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार या सर्वांना दाबण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.
ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने मुंबई, महाराष्ट्राचा अवमान होतो त्याचे समर्थन करता येत नाही; पण सरकारच्या अशा दहशतीचेही
समर्थन करता येणार नाही. या कृतीमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे.

कालपरवापर्यंतही कंगनाच्या बंगल्याचे ते बांधकाम होतेच, पण तोवर कारवाई झाली नाही आणि अचानक तिने घेतलेल्या भूमिकेनंतर बांधकाम अवैध ठरवून पाडण्यात आले. केवळ बदल्याच्या भावनेने केलेली कारवाई महाराष्ट्राला शोभणारी नाही, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: This is the government sponsored terror in Maharashtra; Sauys BJP Leader Devendra Fadnavis