शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचा शासनाचा आदेश निघाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:03 AM2020-05-23T04:03:23+5:302020-05-23T04:03:50+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या खरीप पीक आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.

Government orders to give peak loans to farmers | शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचा शासनाचा आदेश निघाला

शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचा शासनाचा आदेश निघाला

Next

मुंबई : महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत लाभ न मिळालेल्या ११ लाख १२ हजार शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी नवे पीक कर्ज देण्याचा आदेश राज्य शासनाने गुरुवारी काढला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या खरीप पीक आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.
शुक्रवारी लगेच त्यासंबंधीचा आदेश काढण्यात आला. हा आदेश राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांसाठी लागू
असेल. ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही अशा शेतकºयांना थकबाकीदार न मानता नवे पीककर्ज दिले जाईल. कर्जाच्या थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे बाकी, असे नमूद करून बँकांनी शेतकºयांना
नव्याने कर्ज द्यावे, असे आदेशात
म्हटले आहे.

Web Title: Government orders to give peak loans to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.