बहिणीसाठी भावाने पिंजून काढला गोदाघाट

By Admin | Updated: August 31, 2015 00:23 IST2015-08-31T00:23:14+5:302015-08-31T00:23:14+5:30

शोधू कुठे? : ऐन रक्षाबंधनालाच झाली ताटातूट

Godaghat has been caged for his sister | बहिणीसाठी भावाने पिंजून काढला गोदाघाट

बहिणीसाठी भावाने पिंजून काढला गोदाघाट

धू कुठे? : ऐन रक्षाबंधनालाच झाली ताटातूट
अझहर शेख : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचे नाते अधिकाधिक घ˜ करण्याचा दिन. या औचित्यावर बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ बहिणीकडून औक्षण करून घेत तिच्या सुरक्षेचे अभिवचनच देतो; या अभिवचनाचे पालन कुंभपर्वणीमध्ये एका भावाकडून केला जात असल्याचा प्रत्यय आला. संपूर्ण रात्र जागून काढत सैरभैर होऊन या भावाने ताटातूट झालेल्या बहिणीच्या शोधासाठी अवघा गोदाघाट पालथा घातला; मात्र भेट घडली नाही.
बिहारच्या गया जिल्‘ातील उतरामा गावामध्ये राहणारे रामानुजमसिंग व शकुंतलादेवी (६४) हे बहीण-भाऊ कुंभनगरीत पहिल्या शाही पर्वणीसाठी पूर्वसंध्येलाच दाखल झाले होते. शाहीस्नानाची पर्वणी साधत पूण्यकर्म करण्याची अपेक्षा मनाशी धरून मोठ्या आनंदाने ते औरंगाबादरोडवर मुक्कामी राहिले. मध्यरात्रीच्या सुमारास हे दोघे टाळकु टेश्वर पुलावर आले. तेथून ते अंघोळीसाठी गोदातीरावर उतरत असताना अचानकपणे भाविकांच्या गर्दीला लोंढा आला. या लोंढ्यातच शितळा देवी मंदिराच्या उतारावरून रामानुजम यांच्या हातातून शकुंतलादेवींचा हात सुटला अन् या भाऊ-बहिणींची ताटातूट झाली. सुमारे पहाटे चार वाजेपासूनच भाऊ रामानुजमसिंग हा बहिणीला शोधण्यासाठी कासावीस झाला. त्याची तेव्हापासून सुरू झाली गोदाकाठी भटकं ती. सकाळ उजाडली अन् त्याच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या. दिवसाच्या उजेडामध्ये आपली वृद्ध बहीण कोठेतरी आढळून येईल हा आशावाद घेऊन तो भाऊ सुसाटपणे पोलिसांचा जाचाचा सामना करत बॅरिकेड ओलांडून शितळा देवी, टाळकुटेश्वर मंदिर, रोकडोबा पटांगण, गौरी पटांगण, अमरधाम परिसरात फि रू लागला. यावेळी बहुसंख्य पोलिसांनी बहिणीला भेटण्यासाठी आतुर झालेल्या सैरावैरा धावणार्‍या भावाला अडविले. त्याला भाविक मार्ग, प्रशासकीय मार्ग, आपत्कालीन मार्गाचे नियम सांगायला लागले; मात्र त्याचे त्यांच्या सूचनांकडे काहीही लक्ष नव्हते. त्या भावाच्या नजरा हरविलेल्या वृद्ध बहिणीला दाहीदिशा शोधत होत्या.

इन्फ ो...........
अन् गोदाकाठी घुमल्या भावाच्या भावना
पहाटे चार वाजेपासून सैरभैर होऊ न बहिणीला शोधणार्‍या भावाच्या भावना अखेर सकाळी अकरा वाजता अमरधाम पोलीस चौकीतून ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने गोदाकाठी घुमल्या. पोलिसांनी त्या भावाच्या वेदना समजून घेत त्याच्या हातात माईक दिला. माईक हातात येताच त्याच्या तोंडातून शब्द फुटण्याऐवजी डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. अखेर त्याने स्वत:ला सावरत भावनांना आवर घातला आणि बहीण शकुंतलाच्या नावाने बिहारी भाषेतून त्याने सूचना दिल्या.

Web Title: Godaghat has been caged for his sister