'फळपिक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून कंपन्यांच्या फायद्याची'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:18 PM2020-07-09T17:18:40+5:302020-07-09T17:19:35+5:30

शासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहे.

'Fruit crop insurance scheme not for the benefit of farmers but for the benefit of companies', radhakrishna vikhe patil | 'फळपिक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून कंपन्यांच्या फायद्याची'

'फळपिक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून कंपन्यांच्या फायद्याची'

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर फळपिकाला मागणी नसून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. कोरोनाचे संकट अद्यापही दूर झाले नसल्याने फळपिकांची जोखीम अधिकच वाढली आहे.

मुंबई - भाजपा नेते आणि आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहेत. फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीसदर्भात हे पत्र असून फळबागधारक शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे पाटील यांनी या पत्रातून म्हटले आहे. फळपिक विमा योजनेतील निकष वास्तव नैसर्गिक परिस्थितीला धरून नाहीत. त्यामुळे, फळपिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्याच्या लाभासाठीॽ असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

शासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहे. तथापी बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान आणि होणारा तोटाही निश्चितच जास्त असतो. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. सन 2020 साली राबविण्यात येणाऱ्या फळपिक विमान योजनेचा दिनांक 5 जून 2020 या कृषी विभागाच्या शासन निर्णयाचे अवलोकन केले असता, सदरची विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून विमा कंपन्यांचे हित संवर्धन करणारी असल्याचे दिसते, असे म्हणत या योजनेतील निकष बदलण्यात यावेत, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या शासन निर्णयानुसार शेतकरी योजनेपासून परावृत होतोय. त्यामुळे निकष तातडीने बदला, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फळपिकाला मागणी नसून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. कोरोनाचे संकट अद्यापही दूर झाले नसल्याने फळपिकांची जोखीम अधिकच वाढली आहे. या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यामुळे, शासनाने निश्चित केलेल्या फळपिक विमा योजना 2020 च्या निकषात ट्रिगरचा तातडीने फेरविचार करुन सुधारित ट्रीगर व निकष जाहीर करावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पाटील यांनी हे पत्रही शेअर केले आहे. 
 

Web Title: 'Fruit crop insurance scheme not for the benefit of farmers but for the benefit of companies', radhakrishna vikhe patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.