रियल इस्टेट कन्सल्टंटची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:07 IST2021-05-11T04:07:22+5:302021-05-11T04:07:22+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एका प्रख्यात बांधकाम कंपनीने प्रकल्पात कार्यालय देत असल्याचे सांगून पैसे घेत रियल इस्टेट कन्सल्टंटची ...

Fraud of real estate consultants | रियल इस्टेट कन्सल्टंटची फसवणूक

रियल इस्टेट कन्सल्टंटची फसवणूक

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एका प्रख्यात बांधकाम कंपनीने प्रकल्पात कार्यालय देत असल्याचे सांगून पैसे घेत रियल इस्टेट कन्सल्टंटची ५३ लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे.

रियल इस्टेट कन्सल्टंटने कार्यालय मिळावे यासाठी कंपनीकडे ५३ लाख रुपये जमा केले हाेते. मात्र पैसे देऊनही कार्यालयासाठी जागा न मिळाल्याने तसेच संबंधित टाळाटाळ करू लागल्याने आपली यात फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी याप्रकरणी रविवारी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पाेलीस अधिक तपास करत आहेत.

.............................................

पैशांच्या वादातून हत्येचा प्रयत्न

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पैशांच्या वादातून रमाकांत शिंदे (२४) या तरुणावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता घडली.

रमाकांत याचे त्याच्याच ओळखीच्या एकासाेबत पैशांवरून वाद झाले हाेते. याच रागात त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची तक्रार त्याने ओशिवरा पाेलीस ठाण्यात केली. त्यानुसार ओशिवरा पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक चाैकशीअंती त्यांनी आरोपीला अटक केली आहे.

...............................

Web Title: Fraud of real estate consultants