Four-month imprisonment for ex-MLA Sircar | माजी आमदार सिरस्कार यांच्यासह चौघांना एक महिन्याचा कारावास!
माजी आमदार सिरस्कार यांच्यासह चौघांना एक महिन्याचा कारावास!

बाळापूर: भारिप-बहुजन महासंघाचे माजी आमदारवंचित बहुजन आघाडीचे नेते बळीराम सिरस्कार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या चौघांना बाळापूर शहरात विनापरवानगी फलक लावून आचारसंहिता भंग केल्या प्रकरणात बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी बाळापूर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश रघुवंशी यांनी एक महिन्याचा साधा कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

२0१४ च्या विधानसभा निवडणुकीत बळीराम सिरस्कार हे भारिप-बमसंचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. विधानसभेची आचारसंहिता लागू असल्यानंतर फलक, बॅनर लावण्यासाठी निवडणूक आयोगाची रीतसर परवानगी घ्यावी लागते; परंतु सिरस्कार यांच्यासह भारत निखाडे, चरणसिंग चव्हाण आणि सुरेंद्र तेलगोटे यांनी परवानगी न घेता, बाळापूर शहरात विद्युत खांबांवर काही ठिकाणी प्रचाराचे फलक लावले. या प्रकरणात चौघांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्या प्रकरणात तक्रार देण्यात आली होती. बाळापूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Four-month imprisonment for ex-MLA Sircar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.