Join us  

एनसीबीचं कार्यालय असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग 

By पूनम अपराज | Published: September 21, 2020 4:23 PM

या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एनसीबीचे कार्यालय असून इमारतीत मुंबई एसआयटीचे अधिकारीही असल्याची माहिती मिळत आहे. 

ठळक मुद्देआज दुपारी १. १५ वाजताच्या दरम्यान ही आग लागली असून याच इमारतीत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मुंबई - बॅलार्ड इस्टेट येथील एनसीबीचे कार्यालय असलेल्या एक्सचेंज इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या ही आग विझवत आहे. फोर्ट परिसरातील या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एनसीबीचे कार्यालय असून इमारतीत मुंबई एसआयटीचे अधिकारीही असल्याची माहिती मिळत आहे. 

 

 

आज दुपारी १. १५ वाजताच्या दरम्यान ही आग लागली असून याच इमारतीत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच याच इमारतीत सुशांत प्रकरणातील ड्रग्ज संबंधी तपासासाठी रियासह अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अद्याप आगीचं कारण स्पष्ट नसून एनसीबीच्या तपासात मात्र या आगीमुळे अडचण आली आहे. या आगीत कोणीही जखमी नाही. 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

 

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

 

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

 

 

टॅग्स :आगसुशांत सिंग रजपूतअमली पदार्थअग्निशमन दल