गोवंडीतील गोडाऊनला भीषण आग, फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 02:36 PM2018-03-19T14:36:03+5:302018-03-19T16:56:47+5:30

गोवंडीतील महाराष्ट्र कम्पाऊंडमध्ये असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे.

fire broke out in govandi | गोवंडीतील गोडाऊनला भीषण आग, फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी

गोवंडीतील गोडाऊनला भीषण आग, फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी

Next

मुंबई- गोवंडीतील महाराष्ट्र कम्पाऊंडमध्ये असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. गोवंडी रोडवरील आयशा हॉलच्या बाजूला असलेल्या गोडाऊनला दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. आग विझविण्यासाठी 8 फायर इंजिन, 4 जे.टी व 2 वॉटर टँकर घडनास्थळी दाखल झाले होते त्यांच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. डेकोरेशन मटेरीअलचं हे गोडाऊन असून आगीत सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, आग विझविण्यात आली असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

Web Title: fire broke out in govandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.