‘तांडव’विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:06 IST2021-01-21T04:06:42+5:302021-01-21T04:06:42+5:30

सैफ अली खानचा आराेपी म्हणून समावेश : घाटकोपर पोलिसांकड़ून तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘तांडव’ वेब सिरीजमधील ...

Filed a case against 'Tandav' | ‘तांडव’विरोधात गुन्हा दाखल

‘तांडव’विरोधात गुन्हा दाखल

सैफ अली खानचा आराेपी म्हणून समावेश : घाटकोपर पोलिसांकड़ून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘तांडव’ वेब सिरीजमधील काही दृश्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आमदार राम कदम यांनी घाटकाेपर पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन केले. अखेर त्यांच्या तक्रारीवरून बुधवारी पोलिसांनी ‘तांडव’मधील अभिनेता सैफ अली खानसह संबंधित कलाकारांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

‘तांडव’ या वेब सिरीजमधील आक्षेपार्ह देखावे आणि संवादांमुळे हिंदू देव-देवतांची विटंबना केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविराेधात मुंबईसह ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेरही तांडवविरोधात गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी दोन दिवस आंदोलन सुरू होते. अखेर बुधवारी कदम यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी तांडवच्या समूहाविरोधात गुन्हा दाखल केला. या आरोपींमध्ये अभिनेता सैफ अली खान, अली अब्बास जफर, हिमांशू कृष्णा मेहरा, गौरव सोलंकी, अपर्णा पुरोहित, अमित अग्रवाल तसेच वेब मालिकेतील अन्य कलाकारांचा समावेश आहे.

याप्रकरणी संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येतील. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली.

................................

Web Title: Filed a case against 'Tandav'