‘कुलगुरूंची हकालपट्टी करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:19 AM2017-09-01T01:19:10+5:302017-09-01T01:19:20+5:30

वारंवार डेडलाइन चुकविणाºया आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाºया, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.

'Expulsion of vice chancellor' | ‘कुलगुरूंची हकालपट्टी करा’

‘कुलगुरूंची हकालपट्टी करा’

Next

मुंबई : वारंवार डेडलाइन चुकविणाºया आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाºया, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभाविपचे मुंबई महानगर कार्यालयमंत्री अमित तांबुळकर यांनी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली.
तांबुळकर म्हणाले की, ‘आतापर्यंत तीन वेळा विद्यापीठाने डेडलाइन पाळलेली नाही. याशिवाय ३१ आॅगस्टची डेडलाइनही उलटत आली असून, अद्याप सर्व निकाल लागलेले नाहीत. त्यात विद्यापीठाने घाईघाईत लावलेल्या निकालात हुशार विद्यार्थीही नापास झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पुन्हा एकदा तपासणीसाठी द्याव्या लागणार आहेत. तर उशिरा लागलेल्या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांनी परराज्यातील आणि परदेशातील प्रवेशाला मुकावे लागले आहे.
याची जबाबदारी स्वीकारून विद्यापीठाने कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी
करावी, तसेच संबंधित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देऊन, विद्यापीठावर प्रभारी आणि प्र कुलगुरूंऐवजी
पूर्ण वेळ अधिकाºयाची नेमणूक करावी.’
दोषरहित निकालाची मागणी करत, अभाविपने पुनर्मूल्यांकनासाठी काही महाविद्यालय जास्त शुल्क आकारत असल्याचा आरोपही केला आहे. संबंधित महाविद्यालयांवर विद्यापीठाने कठोर कारवाईची मागणी अभाविपने केली आहे, शिवाय निकालांच्या गोंधळामुळे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

Web Title: 'Expulsion of vice chancellor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.