मिठी नदीतून सापडलेल्या वस्तुंची फॉरेन्सिक तपासणी, सीपीयू, हार्डडिस्कमधील डाटा शाेधण्यासाठी तज्ज्ञांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:43 AM2021-03-30T07:43:10+5:302021-03-30T07:44:06+5:30

स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला  वांद्रेतील मिठी नदीच्या  पात्रातून मिळालेल्या  महत्त्वपूर्ण पुराव्यांची आता फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी केली जाईल.

Experts help in forensic examination of items found in Mithi river, CPU, hard disk data retrieval | मिठी नदीतून सापडलेल्या वस्तुंची फॉरेन्सिक तपासणी, सीपीयू, हार्डडिस्कमधील डाटा शाेधण्यासाठी तज्ज्ञांची मदत

मिठी नदीतून सापडलेल्या वस्तुंची फॉरेन्सिक तपासणी, सीपीयू, हार्डडिस्कमधील डाटा शाेधण्यासाठी तज्ज्ञांची मदत

Next

मुंबई  - स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला  वांद्रेतील मिठी नदीच्या  पात्रातून मिळालेल्या  महत्त्वपूर्ण पुराव्यांची आता फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी केली जाईल. त्यातील बहुतांश डाटा खराब झाला असला तरी  तज्ज्ञांद्वारे त्यातील  माहिती जमविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या या वस्तू हा वाझेच्या कटाबाबत सबळ पुरावा मानला जात आहे.

निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने आपल्याविरुद्धचे पुरावे सापडू नयेत म्हणून गुन्ह्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तू, दस्तऐवज मिठी  नदीच्या पात्रात फेकून दिल्या होत्या. रविवारी अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी शोधमोहीम राबविली. वाझेने सांगितलेल्या  परिसरात १२ पाणबुड्यांना शोध घेण्यास सांगितले. त्यामध्ये दोन सीपीयू,  दोन हार्डडिस्क, एकाच क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट आणि आणि अन्य साहित्य सापडले. नदीत टाकण्यापूर्वी वाझेने ते जाड वस्तूने ठोकून खराब केले होते. त्यामुळे त्यातील डाटा परत मिळविणे अडचणीचे ठरेल. त्यासाठी तो तातडीने फोरेन्सिक लॅबकडे पाठविला  जाणार असल्याचे समजते.

रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मिठी नदीच्या वांद्रे येथील पात्राकडे पथक वाझेला सोबत घेऊन गेले.  एनआयएचे एसपी विक्रम खलोट यांच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन तास पाण्यात शोध घेण्यात आला.  

वाझे-मनसुख भेटीचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज
 मुंबई : सचिन वाझे व मनसुख हिरेन हे सीएसएमटी परिसरात भेटल्याचे आणखी एका सीसीटीव्ही  कॅमेऱ्याच्या फुटेजमधून एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या भेटीत हिरेन ‘त्या’ स्काॅर्पिओची चावी इनोव्हाच्या चालकाकडे देत असल्याचे दिसत आहे.
 अंबानींच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्काॅर्पिओ १२ फेब्रुवारीला चोरीला गेल्याची तक्रार हिरेन यांनी दिली होती. प्रत्यक्षात ती चोरीला गेलीच नव्हती. वाझेच्या सांगण्यावरून त्याबाबत खोटी तक्रार नोंदविली होती, ही बाब स्पष्ट झाली आहे. एनआयएचे पथक त्याबाबतचा अधिक तपशील जाणून घेत आहे. 
nवाझे व मनसुख हे सीएसएमटी परिसरात भेटल्याचे आणखी एक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सापडले असून, त्यामध्ये हे दोघे सुमारे १० मिनिटे चर्चा करतात, त्यानंतर हिरेन गाडीची चावी इनोव्हाच्या चालकाकडे देऊन निघून जात असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: Experts help in forensic examination of items found in Mithi river, CPU, hard disk data retrieval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.