अखेर ‘त्या’ कोरोना पॉंझिटिव्ह महिलेचा उपचाराअभावी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 02:24 AM2020-07-23T02:24:24+5:302020-07-23T06:38:27+5:30

चार रुग्णालयांनी दाखल करण्यास दिला नकार

Eventually ‘that’ corona positive woman died due to lack of treatment | अखेर ‘त्या’ कोरोना पॉंझिटिव्ह महिलेचा उपचाराअभावी मृत्यू

अखेर ‘त्या’ कोरोना पॉंझिटिव्ह महिलेचा उपचाराअभावी मृत्यू

Next

मुंबई : चार रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याने मुंबईत ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महिलेचा पती रिक्षातून घेऊन रुग्णालयांमध्ये धावाधाव करीत होता. पण चार रुग्णालयांनी कोरोना रिपोर्ट नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर सायन रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला.

भांडुप गावातील सुषमा भेलेकर असे महिलेचे नाव असून सोमय्या यांच्या माहितीनुसार, सुषमा यांचे पती अनिल रविवारी त्यांना रिक्षातून मिठागर, सावरकर आणि डॉ. आंबेडकर हॉस्पिटलला गेले होते. पण रुग्णालयांनी कोरोना चाचणीचा अहवाल नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर सायंकाळी आठ वाजता त्यांना सायन रुग्णालयाने दाखल करून घेतले; मात्र नंतर डॉक्टरांनी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

याविषयी, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले, या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. सायन रुग्णालयात दाखल केले त्या वेळेस या रुग्ण महिलेची प्रकृती गंभीर होती. रुग्णाच्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी ३५ च्या खाली गेली होती़
रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला दाखल केल्यानंतर त्वरित औषधोपचार सुरू केले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांचा मृत्यू झाला. भांडुपमधील या घटनेची माहिती मिळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

उपस्थित केले असून मृत्यूला जबाबदार कोण? अशी विचारणा केली आहे.
ंरुग्णाच्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी ३५ च्या खाली गेली होती़हे कमी प्रमाण असून यामुळे जीवाला धोका निर्माण होतो.

Web Title: Eventually ‘that’ corona positive woman died due to lack of treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.