कोविड-१९ नंतरही ग्लोबल वॉर्मिंगचे चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 04:34 PM2020-09-12T16:34:59+5:302020-09-12T16:38:03+5:30

लॉकडाऊन हटले आणि प्रदूषण वाढले

Even after Kovid-19, the clicks of global warming | कोविड-१९ नंतरही ग्लोबल वॉर्मिंगचे चटके

कोविड-१९ नंतरही ग्लोबल वॉर्मिंगचे चटके

Next
ठळक मुद्देमुंबईच्या हवा-प्रदुषणाच्या पातळी मध्ये १७ मार्चपासूनच घट झाली.१७ मार्च ते २२ मार्च २०२० या कालावधीत वांद्रे व कुर्ला या परिसरात हवा-प्रदुषणात मोठी घट झाली. एप्रिल पर्यंत प्रदूषणात घट होती. मात्र लॉक डाऊन शिथिल झाल्याने परिस्थिती जैसे थे तैसे झाली. 

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जगभरात लागू करण्यात आलेलया लॉकडाऊनमुळे बहुतांशी ठिकाणावरील प्रदूषण कमी झाले होते. मात्र आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा प्रदूषणात भर पडली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रकोपदेखील कमी झालेला नाही. परिणामी कोविडनंतरदेखील ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसणार आहेत. लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन ४ ते ७ टक्के  घटल्याचा अंदाज आहे. विशेषत: एप्रिल २०२० मध्ये जेव्हा लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरु होता तेव्हा गतवर्षीच्या तुलनेत उत्सर्जन १७ टक्के घटले होते. मात्र जून महिन्यात हे प्रमाण ४ टक्क्यांवर आले. दुसरीकडे मुंबईत देखील कमी झाले प्रदूषण पुन्हा एकदा वाढले असले तरी मान्सूनमुळे मात्र सध्या किंचित दिलासा आहे. 

जगासह देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जानात घट झाली होती. मात्र आता काही कालावधीनंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे तैसे झाली आहे. १० सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रकडून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. युनायटेड इन सायन्स या शीषकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ होत आहे. याच काळात पॅरिस करार लागू करणे कठीण होऊ न बसले आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा हिमनग, महासागर, निसर्ग, अर्थव्यवस्था आणि मनुष्यावर परिणाम होत आहे. या व्यतीरिक्त उष्णतेच्या लाटेत वाढ होणे. जगलांना आग लागणे. दुष्काळ पडणे आणि पूर येणे अशा घटनाही वाढल्या आहेत. ग्लोबल वॉर्मिंगला थोपवायचे असेल आणि तापमान वाढ १.५ डिग्रीखाली आणायची असेल आपल्या हातात पुरेसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. यासाठी आपल्याला विज्ञानावर विश्वास ठेवला पाहिजे. निर्णायत्मक पाऊल उचलले पाहिजे, असे अहवाल म्हणतो.

--------------

...तर प्रदूषणाची पातळी नियंत्रित

कोरोनामध्ये मुंबईचा विचार करता बांधकाम क्षेत्र, वाहतूक व दळणवळण, उद्योगधंदे बंद असल्याने प्रदूषणाची पातळी कमी झाली. मागील दहा वर्षाचा विचार करता वातावरण प्रदूषण वाढीस मोठया प्रमाणावर जबाबदार असलेले बांधकाम, वाहतूक, दळणवळण व उद्योगधंदे यावर नियंत्रण ठेवले तर प्रदूषणाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल. आता पुन्हा वाहतूक व दळणवळण सुरु झाल्याने प्रदूषण नियंत्रणात अडचणी येत आहेत. 

--------------

हवा समाधानकारक पण...

मुंबई महापालिकेनेही वायु वैविध सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत तयार केलेला वायूप्रदूषण पातळीबाबतचा अहवाल जारी होता. या अहवालानुसार प्रदूषित ठिकाणांची हवादेखील समाधानकारक नोंदविण्यात आली होती. चेंबूर, भांडुप, बाकेसी, कुलाबा, अंधेरी, मालाड, माझगाव, वरळी आणि बोरीवली येथील हवेची नोंद करण्यात आली होती.

--------------

Web Title: Even after Kovid-19, the clicks of global warming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.