पर्यावरणशास्त्र खुणावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:59 AM2018-06-14T04:59:27+5:302018-06-14T04:59:27+5:30

मोठमोठ्या उद्योगधंद्यांत पर्यावरण संशोधनाचा स्वतंत्र विभाग असतो. प्रदूषित कचरा, टाकाऊ पदार्थ आणि सांडपाणी यांचे सुव्यवस्थित नियोजन करणे ही त्या विभागाची जबाबदारी असते.

 Environmentalists are notable | पर्यावरणशास्त्र खुणावतेय

पर्यावरणशास्त्र खुणावतेय

Next

मोठमोठ्या उद्योगधंद्यांत पर्यावरण संशोधनाचा स्वतंत्र विभाग असतो. प्रदूषित कचरा, टाकाऊ पदार्थ आणि सांडपाणी यांचे सुव्यवस्थित नियोजन करणे ही त्या विभागाची जबाबदारी असते. खाण व्यवसायात तर पर्यावरणशास्त्रज्ञांना बऱ्याच संधी असतात. त्यांना उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणूनही जबाबदारी पार पाडावी लागते. हे पर्यावरण अभियंते विविध प्रदूषणांना आळा घालण्याचे काम करीत असतात. ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचे आहे त्यांच्यासाठीही मोठा कॅनव्हास उपलब्ध आहे.

जगातील विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा सर्वच देशांना पर्यावरणाच्या चिंतेने ग्रासले आहे. म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय कायदे तयार करण्यात आले आहेत, अनेक निकष लावले गेले आहेत. भारतातही अनेक विद्यापीठांत एन्व्हायर्लमेंटल इंजिनीअरिंग, एन्व्हायर्लमेंटल प्लॅनिंग आणि एन्व्हायर्लमेंटल मॅनेजमेंट या विषयांचे प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे. जल, भूमी आणि वायुप्रदूषणाचे प्राणिजीवनावर होणारे परिणाम, त्यावरील उपाययोजना यांचा या पर्यावरणशास्त्राच्या प्रशिक्षणात समावेश असतो. हा विषय विस्तृत आहे. कारण पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, भूगोल, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवाणूशास्त्र यांच्यासोबत आर्किटेक्चर आणि इंजिनीअरिंग हे विषयही पर्यावरणशास्त्रात मोडतात. त्यामुळे वन, वन्यपशूशास्त्र, पर्यावरण नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापन, ऊर्जाप्रणाली आणि पर्यावरण नियोजन यांच्याशी संबंधित क्षेत्रात उमेदवारांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
मोठमोठ्या उद्योगधंद्यांत पर्यावरण संशोधनाचा स्वतंत्र विभाग असतो. प्रदूषित कचरा, टाकाऊ पदार्थ आणि सांडपाणी यांचे सुव्यवस्थित नियोजन करणे ही त्या विभागाची जबाबदारी असते. खाण व्यवसायात तर पर्यावरणशास्त्रज्ञांना बºयाच संधी असतात. त्यांना उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणूनही जबाबदारी पार पाडावी लागते. हे पर्यावरण अभियंते विविध प्रदूषणांना आळा घालण्याचे काम करीत असतात. ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचे आहे त्यांच्यासाठीही मोठा कॅनव्हास उपलब्ध आहे. म्हणून सरकारपासून विद्यापीठे पर्यावरण संबंधातील संशोधनाला प्रोत्साहन आणि पाठबळ देत आहेत. पर्यावरण संरक्षणासंबंधी लोकांमध्ये जागृती निर्माण करीत असतानाच पर्यावरणाशी संबंधित अशा शास्त्रीय व तात्त्विक माहितीचा प्रसार करण्याचे काम काही स्वयंसेवी संस्था करीत असतात. त्यांनाही पर्यावरणशास्त्रज्ञांची मोठी गरज असते. देशाची भौतिक प्रगती साधत असतानाच लोकजीवन सुसह्य आणि सुकर व्हावे यासाठी प्रदूषण नियंत्रणाचे धोरण ठरवणे, जीवसृष्टी आणि भोवतालचा परिसर यांच्यात सुसंतुलन राखणे, पर्यावरणाशी संबंधित शासकीय विभाग आणि खासगी कंपनी यांना सल्ला देणे अशी कामेही पर्यावरणशास्त्रज्ञांना करावी लागतात. यावरून या क्षेत्राची व्याप्ती लक्षात येईल.
पर्यावरणशास्त्र सामान्यपणे एम.एस्सी.च्या वर्गात शिकविले जाते. त्यामुळे शास्त्रातील कोणत्याही शाखेची पदवी या प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाते. तरीही काही विद्यापीठांत बी.एस्सी. पातळीवरही पर्यावरण विषयाचा अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे. या अभ्यासक्रमात विशेषकरून वन, वन्यपशूशास्त्र, पर्यावरण नियंत्रण, पर्यावरणाशी संबंधित जैविक रसायनशास्त्र, पर्यावरण व्यवस्थापन, ऊर्जाप्रणाली आणि पर्यावरण नियोजन हे विषय शिकविले जातात. त्यामुळे रासायनिक अभियांत्रिकी उद्योगांमध्ये व खासगी कंपन्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कार्यासाठी या प्रशिक्षित उमेदवारांना सामावून घेतले जाऊ शकते.
आपल्या भारतात मुंबई, बंगळुरू, दिल्ली, गढवाल, पुणे आणि इंदोर या विद्यापीठांमध्ये पर्यावरण विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही पर्यावरण अभियांत्रिकी विषयातले अभ्यासक्रम शिकविले जातात. जीवशास्त्र, वनशास्त्र, कृषी व पशुवैद्यक या विषयांतील पदवीधरांना देहराडून येथील वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेत दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तेथे त्यांना वन्यपशूशास्त्र हा विषय शिकविला जातो. कारण पर्यावरण म्हणजे केवळ वातावरणातील प्रदूषण रोखणे नाही. जैविक साखळी सुरक्षित ठेवणे हेदेखील पर्यावरणात मोडत असते. सजीवसृष्टी व परिसर यांच्यात संतुलन राखण्याचे कामही पर्यावरणशास्त्रज्ञ करीत असतो. यावरून या
क्षेत्रात किती संधी आहे, याची जाणीव व्हावी.

Web Title:  Environmentalists are notable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.