विद्युत पुरवठा विभाग ‘बेस्ट’ आहे; जीवावर उदार होत ऑन डयुटी २४ तास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 04:34 PM2020-04-11T16:34:39+5:302020-04-11T16:35:24+5:30

लॉकडाऊनच्या काळात केवळ  अत्यावश्यक सेवाच सुरु  असून, अत्यावश्यक सेवा देत असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले जात आहेत.

The electricity supply department is 'Best'; Being generous on life for 24 hours | विद्युत पुरवठा विभाग ‘बेस्ट’ आहे; जीवावर उदार होत ऑन डयुटी २४ तास 

विद्युत पुरवठा विभाग ‘बेस्ट’ आहे; जीवावर उदार होत ऑन डयुटी २४ तास 

Next

 

मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक जण आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात केवळ  अत्यावश्यक सेवाच सुरु  असून, अत्यावश्यक सेवा देत असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले जात आहेत. अशाच प्रकारे मुंबईचा वीज पुरवठा कायम स्वरुपी तेवत ठेवत असलेल्या बेस्टच्या वीज कर्मचा-यांच्या पाठीवरही कौतुकाची थाप पडत आहे. विशेषत: थोडा वेळही वीज पुरवठा खंडीत होऊ  नये म्हणून बेस्टचे वीज कर्मचारी काम करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना प्रेरणा द्यावी, अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.

मुंबई शहराला बेस्टकडून वीज पुरवठा केला जातो आहे. मुंबईच्या उपनगराला टाटा आणि अदानीकडून वीज पुरवठा केला जात आहे. आणि उर्वरित महाराष्ट्राला महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. महावितरण उत्तम काम करत असल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले आहे. महावितरणप्रमाणे बेस्टचे वीज कर्मचारीदेखील काम करत आहेत. बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश सोनमळे यांनी सांगितले की, बेस्टचे अधिकारी, कर्मचारी गेल्या १५ दिवसांपासून मुंबईचा वीज पुरवठा सुरळीत असावा म्हणून काम करत आहेत. ते त्यांचे काम करत अत्यावश्यक सेवा देत आहेत. बेस्टकडून आजघडील पुरविण्यात येत असलेल्या अखंडीत वीज पुरवठयामुळे ९० टक्के लोक घरात बसत आहेत. जर विद्युत पुरवठा खंडीत झाला तर सगळे बाहेर येतील. पण हेच होऊ  नये म्हणून बेस्टचा वीज कर्मचारी मुंबईसाठी काम करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला कोणाकडून काहीच अपेक्षा नाहीत. मात्र ज्या प्रमाणे डॉक्टरचे कौतुक  होत आहे. नर्सचे कौतुक आहेत. पोलीसांचे कौतुक होत आहे. त्याप्रमाणे मायबाप सरकारने बेस्टच्या वीज कर्मचारी वर्गाकडून केल्या जात असलेल्या कामाची दखल घ्यावी. आमचे कौतुक करा, असे आम्ही म्हणत नाही पण आम्हाला प्रेरणा मिळेल एवढे झाले तरी खुप झाले. दरम्यान, जीवावर उदार होत ही मंडळी काम करत असून, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
----------------------------------

बेस्टचे वीज कर्मचारी २४ तास काम करत आहेत.

वीज पुरवठा सुरळीत सुरु आहे.

केबल दुरुस्ती केली जात आहे.

२६ जुलैच्या महापूरात बेस्टने २४ तासांत वीज पुरवठा सुरळीत केला होता.

बेस्टच्या विद्युत विभागात पाच हजार कर्मचारी आहेत; ९०० अधिकारी आहेत. हे सगळे एकाचवेळी काम करत नाहीत.

एक हजार कर्मचारी, पाचशे अधिकारी सतत काम करत आहेत.

इलेक्ट्रिशन, टेक्निकल, जॉइंटर रोज काम करत आहेत. तांत्रिक कर्मचारी म्हणून यांची ओळख आहे.

मुंबईचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम यांनी केले आहे.

Web Title: The electricity supply department is 'Best'; Being generous on life for 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.