विश्वासघातकी अन् पाठीत खंजीर खुपसणारा ठाकरेंचा शब्द; शिंदेसेनेच्या नेत्याची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 20:12 IST2026-01-04T20:10:27+5:302026-01-04T20:12:11+5:30

स्वत:ला हिंदूह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला.

Eknath Shinde Shiv Sena leader Rahul Shewale criticized Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray | विश्वासघातकी अन् पाठीत खंजीर खुपसणारा ठाकरेंचा शब्द; शिंदेसेनेच्या नेत्याची जहरी टीका

विश्वासघातकी अन् पाठीत खंजीर खुपसणारा ठाकरेंचा शब्द; शिंदेसेनेच्या नेत्याची जहरी टीका

मुंबई - काँग्रेससोबत जाणार नाही, हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही हा बाळासाहेबांचा शब्द होता. बाळासाहेबांचा शब्द हा धनुष्यबाणासारखा होता, एकदा सुटला की आरपार जायचा. मात्र ठाकरेंचा शब्द यू टर्न मारणारा असून तो त्यांच्यावरच उलटणार आहे अशी टीका शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर केली आहे.

उद्धवसेना-मनसे युतीच्या वचननाम्यावर राहुल शेवाळे यांनी सडकून टीका केली. यावेळी शेवाळे म्हणाले की, एकमेकांना विश्वासघातकी म्हणणारे, पाठीत खंजीर खुपसला म्हणणारे आणि आपलाच शब्द गिळणारे ते आहेत. त्यामुळे मुंबईकर जनता ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही. त्यांचा शब्द भ्रष्टाचाराचा, मतलाबाचा आणि तिजोरी लुटण्याचा आहे. त्यामुळेच त्यांनी वचननाम्यातमध्ये जाणीवपूर्वक हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख टाळला असा आरोप त्यांनी केला.

तसेच स्वत:ला हिंदूह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर आणि सन्मान न करणारा उबाठा मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा शिवसैनिकाला आणि मराठी माणसाला वेदना देणारा आहे. संपूर्ण वचननाम्यात हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख टाळून उबाठाने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षातच अवमान केला आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय, कोळीवाड्यांची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय का नाही घेतले असा सवाल शेवाळे यांनी उपस्थित करत आजचा वचननामा म्हणजे बालकांना वाचवायचा पालकांनी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मराठीसाठी एकत्र आलेल्या उबाठा आणि मनसेनं निवडणूक वचननाम्यात ४० टक्के इंग्रजी शब्दांचा वापर केला. विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी वचननाम्यातून मराठी माणूस, हिंदु, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट शब्द वगळले. या वचननाम्यावर बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव आहे.  ठाकरेंनी २०१७ वचननाम्यातील मुद्दे पुन्हा कॉपीपेस्ट करुन इंग्रजी भाषेत सादर केले. वचननाम्यात ४० टक्के इंग्रजी शब्दांचा वापर केला. मराठीऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर केल्यास खळखट्याक करणारे आता वचननाम्यातून मराठीची गळचेपी करणाऱ्यांना धडा शिकवणार का असा सवाल करत राहुल शेवाळे यांनी राज ठाकरेंवर घणाघात केला. 

Web Title : धोखेबाज! ठाकरे का शब्द खंजर: शिंदे सेना नेता की जहरीली आलोचना।

Web Summary : राहुल शेवाले ने ठाकरे-राज गठबंधन के घोषणापत्र की आलोचना करते हुए इसे बालासाहेब के आदर्शों के साथ विश्वासघात बताया। उन्होंने उन पर विशिष्ट समुदायों को खुश करने और 'हिंदू हृदय सम्राट' जैसे प्रमुख शब्दों को छोड़कर मराठी पहचान की उपेक्षा करने का आरोप लगाया।

Web Title : Betrayer! Thackeray's word a dagger: Shinde Sena leader's venomous criticism.

Web Summary : Rahul Shewale slams Thackeray-Raj alliance's manifesto, calling it a betrayal of Balasaheb's ideals. He accuses them of appeasing specific communities and neglecting Marathi identity by omitting key terms like 'Hinduhridaysamrat'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.