'ज्यानं मराठी बाईचं कुंकू पुसलं त्याला वाचविण्याचा प्रयत्न दिल्लीपासून होतोय'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 10:34 PM2020-11-11T22:34:40+5:302020-11-11T22:37:45+5:30

रेवदंड्याच्या पलीकडे असलेल्या किल्ल्यापासून काही अंतरावर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली. 21 मार्च 2014 रोजी यासाठी व्यवहार झाला. 2 कोटी 20 लाख रुपयांचा हा व्यवहार होता.

'Efforts are being made from Delhi to save the Marathi woman who wiped her kumkum', anil parab on arnabd goswami | 'ज्यानं मराठी बाईचं कुंकू पुसलं त्याला वाचविण्याचा प्रयत्न दिल्लीपासून होतोय'

'ज्यानं मराठी बाईचं कुंकू पुसलं त्याला वाचविण्याचा प्रयत्न दिल्लीपासून होतोय'

Next
ठळक मुद्देरेवदंड्याच्या पलीकडे असलेल्या किल्ल्यापासून काही अंतरावर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली. 21 मार्च 2014 रोजी यासाठी व्यवहार झाला. 2 कोटी 20 लाख रुपयांचा हा व्यवहार होता.

मुंबई - इंटिरियर डिझाईनर अन्वय नाईक यांच्या कुटुंबानं ठाकरे परिवाराशी आर्थिक व्यवहार केल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्या व्यवहाराची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेला द्यावी, अशी मागणी सोमय्यांनी केली. त्यानंतर, शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीय सोमय्यांना फटकारला असून ते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. 

रेवदंड्याच्या पलीकडे असलेल्या किल्ल्यापासून काही अंतरावर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली. 21 मार्च 2014 रोजी यासाठी व्यवहार झाला. 2 कोटी 20 लाख रुपयांचा हा व्यवहार होता. ठाकरे आणि वायकर यांनी नाईक कुटुंबाकडे सदर जमीन खरेदी केली. नाईक कुटुंबासोबत असे आणखी किती व्यवहार झाले? अशा किती जमिनी घेण्यात आल्या?, असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले आहेत. सोमय्यांच्या या टीकेनंतर शिवसेनेनं उत्तर देताना, दिल्लीपासून सर्वच नेते अर्णब यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 
 
''ज्यानं एका मराठी बाईचं कुंकू पुसलं, अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासूनचे सर्व नेते करत असल्याचंही परब म्हणाले. किरीट सोमैय्या हे अर्णब गोस्वामी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ ते एखाद्या हत्याऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका मराठीबाईचं कुंकू ज्यानं पुसलं, अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासूनच होत आहे,'' असा आरोपच परब यांनी केला आहे.

अर्णब यांची सुटका, समर्थनार्थ घोषणा

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. अखेर अर्णब गोस्वामी यांना 8 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर, आज रात्री 8.15 वाजता तळोजा कारागृहातून अर्णब यांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी गोस्वामी हे बाहेर पडताच गाडीतूनच 'भारत माता कि जय' अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या समर्थकांनी कारागृह परिसरात मोठी गर्दी केली होती. अर्णब जिंदाबाद, भारत माता कि जय यांसारख्या घोषणा सुरु केल्या होत्या. विशेष म्हणजे कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांनी 'हॅपी दिवाळी अर्णब,' 'सत्यमेव जयते' अशा आशयाच्या रांगोळ्या काढल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे स्वागत मोबाईलची टॉर्च लावून सर्वानी केले.

सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

अर्णब गोस्वामी यांना न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. गोस्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या आणखी दोन आरोपींनादेखील जामीन मंजूर झाला आहे. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणं ही मुंबई उच्च न्यायालयाची चूक होती, असं महत्त्वपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान केलं. 

Web Title: 'Efforts are being made from Delhi to save the Marathi woman who wiped her kumkum', anil parab on arnabd goswami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.