Anil Parab : अनिल परब यांना दुसऱ्यांदा दणका, ईडीने पुन्हा पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 08:09 PM2022-06-20T20:09:53+5:302022-06-20T20:16:27+5:30

Anil Parab : विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वीच शिवसेनेचे नेते अनिल परब यांना दणका देण्यात आला आहे.

ED sent summons to Anil Parab for the second time | Anil Parab : अनिल परब यांना दुसऱ्यांदा दणका, ईडीने पुन्हा पाठवले समन्स

Anil Parab : अनिल परब यांना दुसऱ्यांदा दणका, ईडीने पुन्हा पाठवले समन्स

Next

मुंबई - विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वीच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना दणका देण्यात आला आहे. ईडीने परब यांना दुसऱ्यांना समन्स बजावलं आहे. अनिल परब यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश समन्सद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे निकाल लागण्यापूर्वीच शिवसेनेला धक्का बसला आहे.

अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसूली संचलनालयानं (ED) पहिलं समन्स १४ जून रोजी बजावले होते. त्यांना दापोली येथील रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग (Money laundering case) प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आलं होतं असून बुधवारी (१५ जून) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यान अनिल परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालयांसह मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमध्ये ७ ठिकाणी यापूर्वी छापे टाकण्यात आले होते.

यापूर्वी ईडीनं अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकत तब्बल १२ तास झाडाझडती केली होती. मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यावेळी रिसॉर्टची माहिती घेतानाच मूळ जागामालक विभास साठे यांचा जबाबही ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोंदवण्यात आला होता. तर दुसरीकडे अनिल परब यांचे साई रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्राच्या पर्यावरण विभागाचे एक पथक येऊन पाहणी करून गेले. परंतु याच्याशी आपला संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Web Title: ED sent summons to Anil Parab for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.