मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 06:55 IST2025-08-03T06:54:25+5:302025-08-03T06:55:39+5:30

ईडीने याच आठवड्यात गुरुवारी पाच कंत्राटदार कंपन्यांशी निगडित आठ ठिकाणी छापे टाकले होते.

ED raids eight places in connection with alleged scam in Mithi river cleaning work | मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 

मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 

मुंबई : मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शनिवारी आठ ठिकाणी छापे टाकत ४७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही छापेमारी महापालिकेचे उपमुख्य अभियंता प्रशांत तायशेट्ये, पालिकेचे कंत्राटदार मे. ॲक्युट डिझाइन्स, मे. कैलाश कन्स्ट्रक्शन्स, मे. निखिल कन्स्ट्रक्शन, मे. एन. कन्स्ट्रक्शन, मे. जे. आर. एस. कन्स्ट्रक्शन्स यांच्यावर झाली आहे. या जप्तीच्या कारवाईमुळे आतापर्यंत या प्रकरणी एकूण ४९ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. 

ईडीने याच आठवड्यात गुरुवारी पाच कंत्राटदार कंपन्यांशी निगडित आठ ठिकाणी छापे टाकले होते. या कंत्राटदार कंपन्यांनी या घोटाळ्यासाठी बनावट सामंजस्य करारपत्र तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २००७ ते २०२१ या कालावधीत मिठी नदीच्या सफाईचे काम होणार होते. याकरिता कंत्राट देण्यात आले. मात्र, हे काम प्रत्यक्षात झालेच नसल्याचा दावा करण्यात आला आहे.  
 

Web Title: ED raids eight places in connection with alleged scam in Mithi river cleaning work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.