अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 01:13 PM2019-08-03T13:13:46+5:302019-08-03T13:25:21+5:30

मुंबई उपनगर जिल्ह्यात आज शनिवार ३ ऑगस्ट २०१९ रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांनी कळविले आहे.

Due to heavy rains, holiday declared in Mumbai suburban district | अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर

अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर

Next

मुंबई- मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई उपनगर जिल्ह्यात आज शनिवार ३ ऑगस्ट २०१९ रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांनी कळविले आहे. अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील त्यांना सुखरूप पालकांच्या हाती देऊनच शाळा सोडावी. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही बोरीकर यांनी केले आहे.

मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असतानाच, वेगाने वाहणा-या वा-यांमुळे पावसाचे टपोरे थेंब मुंबईकरांना चिंब भिजवत आहेत. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे.

ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा  फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शनिवारी (3 ऑगस्ट) तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. गोरेगावजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे ठाणे, डोंबिवली यासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. 

Web Title: Due to heavy rains, holiday declared in Mumbai suburban district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.