Video : 'दादागिरी नाय करायची'... मुंबईच्या महापौरांची महिलेला दमदाटी, प्रश्न विचारला म्हणून हात पिरगळला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:49 PM2019-08-06T15:49:01+5:302019-08-06T15:50:51+5:30

एका महिलेचा हात परगळत मला दादागिरी दाखवतेस काय असं म्हणत महापौरांनी दमदाटी केली. 

'Do not do Dadagiri' ... Mumbai Mayor's woman waved her hand due to ask a question! | Video : 'दादागिरी नाय करायची'... मुंबईच्या महापौरांची महिलेला दमदाटी, प्रश्न विचारला म्हणून हात पिरगळला!

Video : 'दादागिरी नाय करायची'... मुंबईच्या महापौरांची महिलेला दमदाटी, प्रश्न विचारला म्हणून हात पिरगळला!

Next
ठळक मुद्दे त्यानंतर या दोन्ही मृतदेह त्यांच्या मूळगावी तेलंगणा येथे घेऊन जातेवेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सोमवारी गेले होते.जाणीवपूर्वक माझ्या बदनामीकरिता हा व्हिडीओ वायरल करण्यात आला असल्याचा खुलासा महाडेश्वर यांनी वायरल व्हिडीओबाबत केला.  

मुंबई - सांताक्रूझ पूर्वेकडील पटेल नगर येथील सहयुवक सहजीवन प्रगती मंडळ येथे रविवारी माय - लेकाचा  विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. रविवारी मुंबईसह अनेक शहरात मुसळधार पावसाने झोडपले होते. त्यावेळी सांताक्रूझ येथील गोळीबार कॉलनीत देखील माला नागम (५०) आणि संकेत नागम (२६) या माय - लेकराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  त्यानंतर या दोन्ही मृतदेह त्यांच्या मूळगावी तेलंगणा येथे घेऊन जातेवेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सोमवारी गेले होते. त्यावेळी संतप्त नागरिकांनी महाडेश्वर यांना नागम यांच्या नातेवाईकांना भेटण्यास अटकाव केला आणि रविवारी ही घटना घडली तेव्हा कुठे होता असा नागरिकांना महाडेश्वर यांना जाब विचारला. त्यांनतर माझी अख्खी मुंबई असून ती पहावी लागते असं उत्तर महापौरांनी दिलं. या घटनेदरम्यान जमावातील एका महिलेचा हात परगळत मला दादागिरी दाखवतेस काय असं म्हणत महापौरांनी दमदाटी केली. 

महापौरांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आणि हे प्रकरण उजेडात आले. काल महापौर जेव्हा मृतांच्या नातेवाईकांना भेटायला गेले त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेविका प्रज्ञा भुतकर आणि आमदार तृप्ती सावंत या देखील होत्या. महापौरांच्या चमूसोबत असलेल्या निर्मल नगर पोलिसांनी जमावाची समजूत काढत महापौरांना मृतांच्या नातेवाईकांची भेट घालून दिली असल्याची माहिती निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ संग्राम पाचे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, रविवारी मुसळधार पावसात आई आणि मुलाच्या विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे मृतदेह व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते पाहून मी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी दोन्ही मृतदेह तेलंगणा येथे घेऊन जात असताना मी गोळीबार कॉलनी परिसरात गेलो असता काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी मला मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास अटकाव केला. या मनसे कार्यकर्त्यांमध्ये महिला देखील होत्या. दरम्यान माझ्याभोवती मानवी कडे होते. त्यातून बाहेर पाडण्यासाठी त्या महिलेचा हात बाजूला केला. मी लहानाचा मोठा याचा परिसरातून झालो. तेथूनच नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यामुळे अनेक परिचित लोक देखील काल जमावात होती. जाणीवपूर्वक माझ्या बदनामीकरिता हा व्हिडीओ वायरल करण्यात आला असल्याचा खुलासा महाडेश्वर यांनी वायरल व्हिडीओबाबत केला.  

नेमकी घटना काय घडली होती?

नागम यांच्या राहत्या घरासमोरील माला या शिडीला शॉक लागून चिकटल्या असता त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा संकेत हा गेला असता ते दोघेही शिडीला शॉक लागून चिकटला. त्यांनतर दोघांना पोलिसांनीऔषधोपचारासाठी व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून दाखलपूर्व दोघांना मयत घोषित केले. त्यांनतर परिसरात खळबळ माजली होती असून स्थानिक संतप्त झाले होते.  

Web Title: 'Do not do Dadagiri' ... Mumbai Mayor's woman waved her hand due to ask a question!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.