Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत येऊन कायदा हातात घेऊ नये, गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा, जरांगे पाटलांचेही जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 16:50 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिला.

Ajit Pawar ( Marathi News ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यात मोर्चे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनीही आता राज्य सरकारला इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईत मोर्चा निघणार आहे. २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून मराठा समाज मुंबईसाठी निघणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रीया देत जरांगे पाटील यांना इशारा दिला. 'मराठा आरक्षणासाठी काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्याबाबत घोषणा करत आहेत. संविधानावर देश चालत आहे, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षी कुणीही श्रेष्ठ नाही, हे देखील लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना दिला. 

दरम्यान, आता या इशाऱ्याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे पाटील यांनी एकेरी उल्लेख करत अजित पवारांवर टीका केली. "शेवटी त्यांनी आता पोटातले ओठात आणलेच, पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केले आहे. दहा पाच जणांना जवळ करुन बाकी करोडो मराठ्यांचे वाटोळे केले, शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करुन दाखवावी, मग मराठेही शांततेत उत्तर देतील, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

खळबळजनक! बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये TMC नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या

अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत जरांगे पाटील म्हणाले, 'अजित पवार अपघाताने सत्तेत आलेला माणूस आहे. तो जर असे बोलत असेल , तर आम्ही त्याला सरकार मानत नाही. मुंबईला जाणार आणि ओबीसीतून आरक्षण मिळवणारच, तू कारवाई कर, केव्हा मराठे शांततेत उत्तर देतील, असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिले. 

अजित पवारांनी दिला इशारा

अजित पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यात कुणाचेही दुमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात याबाबत एकमत आहे. पण राज्यात आधीपासूनच ६२ टक्के आरक्षण आहे. यासाठी आता कायद्याचे मार्ग तपासून पाहावे लागणार आहेत. पण काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्याबाबत घोषणा करत आहेत, आपल्या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे, या संविधानावर देश चालत आहे.  संविधानाचा आदर झाला पाहिजे, जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षी कुणीही श्रेष्ठ नाही, हे देखील लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना दिला. 

टॅग्स :मराठा आरक्षणअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमनोज जरांगे-पाटील