सध्या तीन प्रयोगशाळांत कोरोनाची तपासणी, अफवांवर विश्वास ठेवू नका; आरोग्य विभागाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:13 PM2020-03-18T13:13:25+5:302020-03-18T13:23:32+5:30

सध्या या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नसली तरी दीड एक वर्षात लस विकसित करण्यात येईल, असंही अनेक वैद्यकीय सांगत आहेत.

Do not believe the rumors, corona testing currently only three labs; Disclosure of Health Department vrd | सध्या तीन प्रयोगशाळांत कोरोनाची तपासणी, अफवांवर विश्वास ठेवू नका; आरोग्य विभागाचा खुलासा

सध्या तीन प्रयोगशाळांत कोरोनाची तपासणी, अफवांवर विश्वास ठेवू नका; आरोग्य विभागाचा खुलासा

Next
ठळक मुद्देसोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकाराच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली आहे. सध्या या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नसली तरी दीड एक वर्षात लस विकसित करण्यात येईल, असंही अनेक वैद्यकीय सांगत आहेत. कोरोना रक्त तपासणीसंदर्भात महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत आरोग्य विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे.

मुंबईः कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकाराच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली आहे. परंतु हा रोग उपचारानं बरा होत असल्याचं अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी दावा केला आहे. सध्या या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नसली तरी दीड एक वर्षात लस विकसित करण्यात येईल, असंही अनेक वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्याप्रमाणे कोरोना रक्त तपासणीसंदर्भात महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत आरोग्य विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे.

राज्यात संशयित रुग्णांची कोरोनाची तपासणी करत असताना रक्ताची चाचणी घेतली जात नाही. त्या रुग्णाचा 'नसो फॅरिंजियल स्वाब' घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा उपलब्ध असून, मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसांत ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यांच्यासह  चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहे.



त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसंदर्भात महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून  कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147

Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या  

Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण 

Web Title: Do not believe the rumors, corona testing currently only three labs; Disclosure of Health Department vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.