रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस फक्त १७ हजार ९५१ रुपयांचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 02:52 AM2019-09-23T02:52:39+5:302019-09-23T02:52:59+5:30

कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष; मोठा आकडा जाहीर करून दिशाभूल केल्याचा आरोप

Diwali bonus to railway employees is only Rs | रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस फक्त १७ हजार ९५१ रुपयांचा

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस फक्त १७ हजार ९५१ रुपयांचा

Next

मुंबई : देशातील ११ लाख रेल्वे कर्मचाºयांना दिवाळी बोनस म्हणून ७८ दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मात्र, मिळणारा बोनस हा फक्त १७ हजार ९५१ रुपयांचा असणार आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वे कर्मचारी संघटनांनी दिली.

केंद्र सरकारने रेल्वेच्या कर्मचाºयांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली. सरकारने केलेल्या घोषणेतून सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचारी संघटनाकडून बोनसच्या घोषणाबाबत असंतोष व्यक्त केला. बोनस मिळणे प्रत्येक कर्मचाºयांसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र, सीलिंग हटवत बोनस मिळाला, तर कर्मचाºयांच्या वर्गवारीनुसार बोनस मिळेल आणि कर्मचाºयांवर अन्याय होणार नाही, अशी प्रतिक्रिया रेल्वे कर्मचाºयांनी दिली.

पाचव्या वेतन आयोगानुसार बोनस रक्कम मर्यादा ३ हजार ५०० होती. यानंतर, सहाव्या वेतन आयोगानुसार ही बोनस रक्कम
मर्यादा सात हजार करण्यात आली. मात्र, सातव्या वेतन आयोगानंतरही सीलिंग रक्कम तेवढीच ठेवण्यात आल्याने कर्मचाºयांना ७८ दिवसांचा बोनस १७ हजार ९५१ आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वे संघटनांनी दिली.

सरकाकडून ७८ दिवसांचा वेतनाची रक्कम म्हणून बोनस दिला जाईल, अशी घोषणा केली. मात्र, वास्तविकता वेगळी असून देशातील नागरिकांसह रेल्वे कर्मचाºयांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. भारतीय रेल्वेमधील तृतीय आणि चतुर्थी श्रेणीच्या कामगारांना दिवाळीचा फक्त १७ हजार ९५१ रुपयांचा बोनस मिळणार आहे. हा बोनस फक्त १५ दिवसांचा असणार आहे. दरवर्षी दसºयाच्या पूर्वी बोनसची घोषणा केली जाते. रेल्वेचे कर्मचारी वेतनापेक्षा अधिक काम करतात. त्यामुळे त्यांना जास्त बोनस मिळणे अपेक्षित आहे.
- वेणू नायर, महामंत्री, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन

रेल्वे कर्मचाºयांच्या बोनसमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. ७८ दिवसांचे वेतन देण्याची घोषणा केली. मात्र, बोनस किती मिळणार, अशी घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक, रेल्वे कर्मचाºयांना १७ हजार ९५१ रुपये इतका बोनस मिळणार आहे. सरकारच्या बोनसच्या निर्णयाबाबत नाखूश आहे.
- प्रवीण वाजपेयी, सरचिटणीस,
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ.

सरकारकडून नेहमीप्रमाणे तोडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. सरकारच्या या निर्णयावर समाधानी नाही. रेल्वेसेवेतील कर्मचाºयांना मिळणारा बोनस भरमसाठ असल्याचा भ्रम सर्वसामान्यांमध्ये आहे. मात्र, प्रत्यक्षात हा बोनस कमी आहे.
- जितेंद्र पाटील, अध्यक्ष,
नवनिर्माण रेल्वे कामगार सेना.

Web Title: Diwali bonus to railway employees is only Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.