Join us
Daily Top 2Weekly Top 5

सातारा ZPवरून अधिवेशनात वादंग; भाजप-शिंदेसेनेत तणाव, पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 06:18 IST

फडणवीस व शिंदे यांच्यात बैठक झाली. मात्र, तपशील समजला नाही. यावर मुख्यमंत्री सभागृहात निवेदन करतील. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजप या सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये झालेल्या संघर्षाचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. 

मतदानावेळी मंत्र्यांना धक्काबुक्की व सदस्यांना रोखल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केला. मंत्री शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांनीही मारहाण झाल्याचे सांगत पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस आज सभागृहात करणार निवेदन

विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले. मात्र, नंतर सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्याला स्थगिती दिल्याने वाद चिघळला. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील तणावही स्पष्टपणे दिसून आला. संध्याकाळी फडणवीस व शिंदे यांच्यात बैठक झाली. मात्र, तपशील समजला नाही. आज, मंगळवारी यावर मुख्यमंत्री सभागृहात निवेदन करतील. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP election sparks uproar in assembly, strains BJP-Shinde Sena.

Web Summary : Satara ZP elections caused legislative turmoil. Allegations of assault and democratic suppression surfaced, straining BJP-Shinde Sena ties. Police actions drew criticism, prompting demands for investigation. Chief Minister Fadnavis will address the assembly today.
टॅग्स :जिल्हा परिषदसातारा परिसरभाजपाशिवसेनाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस